Join us

इंग्रजी सुधारण्यासाठी आता ‘इंग्लिश ई-टेक’

By admin | Published: September 17, 2016 2:43 AM

मराठी माध्यमाच्या शासकीय आणि महापालिकांच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी मोफत ‘इंग्लिश ई-टेक’ कार्यक्रमाची आखणी केली आहे

मुंबई: मराठी माध्यमाच्या शासकीय आणि महापालिकांच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी मोफत ‘इंग्लिश ई-टेक’ कार्यक्रमाची आखणी केली आहे. आत्तापर्यंत इयत्ता पहिली आणि दुसरीच्या ५६ हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या इंग्रजी बोलता, वाचता न आल्यामुळे नोकरीच्या संधी कमी होतात. त्यामुळे करिअरसाठी विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पाया भक्कम व्हावा यासाठी ‘इंग्लिश ई-टेक’ कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. फ्रान्स आणि जर्मनीत इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी याच पद्धतीचा वापर केला जातो. आपल्या येथे इंग्रजी भाषा पहिलीपासून शिकवणे बंधनकारक आहे. पण, त्यापद्धतीने इंग्रजी शिकवली जात नसल्यामुळे पुस्तकातील प्रत्येक पान हे दृक-श्राव्य माध्यमातून डीव्हीडीज तयार करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाला या डीव्हीडीज मोफत देण्यात आल्या आहेत. प्राथमिक वर्गातील इंग्रजी पुस्तकांबरोबर या डीव्हीडी देण्यात येत आहेत. प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम सुरु करण्याआधी त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. विद्यार्थ्यांनाही इंग्रजीचे शिक्षण घेणे सोपे झाले आहे. पण, अजूनही पुढे जाऊन पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांबरोबर हा कार्यक्रम राबवायचा आहे. अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवायचे असल्याचे ‘इंग्लिश ई-टेक’चे उद्दिष्ट आहे. (प्रतिनिधी)