सुधारित डीपीमध्ये अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नको

By admin | Published: May 21, 2015 01:12 AM2015-05-21T01:12:15+5:302015-05-21T01:12:15+5:30

राज्य सरकारच्या नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात असंख्य त्रुटी आढळून आल्या होत्या़

Improved DP did not interfere with the officers | सुधारित डीपीमध्ये अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नको

सुधारित डीपीमध्ये अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नको

Next

मुंबई : राज्य सरकारच्या नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात असंख्य त्रुटी आढळून आल्या होत्या़ त्यामुळे सुधारित आराखडा तयार करताना शासनाच्या अधिकाऱ्यांसह रद्द आराखड्यात सहभाग असलेल्या पालिकेच्या अभियंत्यांनाही वगळण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी आयुक्त अजय मेहता यांच्याकडे आज केली़
सन २०१४-२०३४ च्या विकास आराखड्यात असंख्य त्रुटी आढळून आल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो आराखडा रद्द ठरविला़ तसेच आवश्यक बदल करून सुधारित आराखडा चार महिन्यांमध्ये तयार करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यासाठी माजी सनदी अधिकारी रामनाथ झा यांची निरीक्षक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे़ त्याचबरोबर राज्य सरकारच्या नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांची मदतही घेतली जाणार आहे़
मात्र रद्द करण्यात आलेल्या विकास आराखड्यात याच अधिकाऱ्यांनी गोंधळ घातला होता़ त्यामुळे सुधारित आराखडा तयार करताना याच अधिकाऱ्यांची मदत घेतल्यास त्रुटी कायम राहतील, अशी भीती शेवाळे यांनी व्यक्त केली़ शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सुधारित आराखड्यांमध्ये कोणतीही नवीन त्रुटी असू नये़ यासाठी नगर रचना खात्याच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊ नये, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना या भेटीदरम्यान केली़ (प्रतिनिधी)

काळबादेवीतील आगीच्या दुर्घटनेमुळे मुंबईतील उत्तुंग इमारतींबरोबरच जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे़ पर्यावरण मंत्रालयाच्या निकषांप्रमाणे कोणत्याही बांधकामाला परवानगी देताना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचीही परवानगी घेणे आवश्यक आहे़ परंतु अशी कोणतीच यंत्रणा मुंबईत नाही़ त्यामुळे अशी यंत्रणा उभारण्यात यावी, अशी सूचना शेवाळे यांनी या वेळी केली़

शिवाजी पार्कवर कायमस्वरूपी राष्ट्रध्वज
शिवाजी पार्कवर कायमस्वरूपी राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, असा प्रस्ताव शिवसेनेने पालिका प्रशासनाकडे सादर केला आहे़ यास मंजुरी मिळाल्यानंतर खासदार निधीतून शिवाजी पार्कवर राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे़ अशा प्रकारे सार्वजनिक मैदानात राष्ट्रध्वज उभारण्याची ही पहिलीच वेळ असेल, असा दावा शेवाळे यांनी केला आहे़

Web Title: Improved DP did not interfere with the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.