लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत उपचारांनंतर सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 06:13 AM2019-11-13T06:13:12+5:302019-11-13T06:13:23+5:30

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Improvement in the nature of Lata Mangeshkar after treatment | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत उपचारांनंतर सुधारणा

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत उपचारांनंतर सुधारणा

googlenewsNext

मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मंगेशकर कुटुंबीयांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती नाजूक असली, तरी त्यात बऱ्यापैकी सुधारणा दिसून येत आहे.
लता मंगेशकर यांना छातीत संसर्ग झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी रात्री दीड वाजणाच्या सुमारास
ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. पॅटीट समधानी हे लतादीदींवर उपचार करीत आहेत. मंगेशकर कुटुंबीयांनी सांगितले, त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे, त्या उपचारांना खूप चांगला प्रतिसाद देत आहेत.
गेली अनेक वर्षे सततच्या गायनामुळे, तसेच वयोमानामुळे लता मंगेशकर यांच्या फुप्फुसाच्या क्षमतेवर काहीसा परिणाम झाला आहे. लवकरच त्यांना घरी पाठविण्यात येईल. तोपर्यंत लतादीदींच्या चाहत्यांनी त्रास देऊ नये, त्या लवकरच
बºया होतील, असे मंगेशकर कुटुंबीयांनी म्हटले आहे.

Web Title: Improvement in the nature of Lata Mangeshkar after treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.