काय सांगता! १२ वर्षांत लोकलचे १२ लाख प्रवासी घटले; खासगी वाहनांच्या संख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 06:47 AM2023-07-11T06:47:27+5:302023-07-11T06:48:17+5:30
ठाण्यात लोकलच्या फेऱ्या १,४५५ वरून १,७५० मध्य रेल्वेच्या ठाणे व त्यापुढील रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची २०११ मधील संख्या १४ लाख होती.
मुंबई : लोकलच्या प्रवासी संख्येत सध्या मोठी घट झालेली दिसते. २०११ मध्ये दररोज सरासरी ८० लाख प्रवासी लोकलने प्रवास करायचे. आता ही संख्या ६८ लाखांवर आली आहे. प्रवासी संख्या घटण्यामागील कारण खासगी वाहनांची वाढलेली संख्या आहे. २०११ मध्ये शहरात ९ लाख कार आणि दुचाकी होत्या. त्यात दुचाकींचे प्रमाण कमी होते, आता त्यात मोठी वाढ झाली आहे. आता एकूण वाहन संख्या ४४ लाखांहून अधिक आहे. त्यात निम्मी संख्या दुचाकींची आहे. २०११ साली बेस्ट बस प्रवाशांची संख्या ३९ लाख इतकी होती. आता सुमारे ३५०० बसमधून ३५ लाख प्रवासी प्रवास करतात.
२०११ : २२ हजार, २०२३ : ५५ हजार रिक्षा ठाण्यात २०११ मध्ये रिक्षांची संख्या २५ हजार होती. २०२३ मध्ये रिक्षांची संख्या १ लाख २५ हजार झाली आहे. ठाणे परिवहन सेवेच्या बसची २०११ मधील संख्या २६० होती. २०२३ मध्ये ठाणे परिवहनच्या सेवेत ३५० बसगाड्या आहेत. प्रत्यक्षात २८० बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. कल्याण आरटीओ क्षेत्रात (ज्यामध्ये उर्वरित जिल्ह्यातील शहरांचा समावेश आहे) तेथे रिक्षांची संख्या २०११ मध्ये २२ हजार होती. २०२३ मध्ये रिक्षांची संख्या ५५ हजार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या २०११ मध्ये १३० बसगाड्या होत्या. २०२३ मध्ये १४१ बसगाड्या आहेत.
Today on world population day, I was just thinking about how population numbers in the most popular countries would look like if the world population was just a mere handful of 100 people. Also, a side thought: ever imagined the amount of space we’d have enjoyed?… pic.twitter.com/AfQskkgwwg
— Rishi Darda (@rishidarda) July 11, 2023
ठाण्यात लोकलच्या फेऱ्या १,४५५ वरून १,७५० मध्य रेल्वेच्या ठाणे व त्यापुढील रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची २०११ मधील संख्या १४ लाख होती. त्यावेळी मध्य रेल्वेच्या लोकलच्या १,४५५ फेऱ्या सुरु होत्या. २०२३ मध्ये रेल्वे प्रवाशांची संख्या २० लाख झाली असून एवढ्या प्रवाशांच्या सेवेकरिता लोकलच्या १,७५० फेया दिवसभर सुरु असतात