कारच्या खिडकीला लटकून तरुणाची स्टंटबाजी; शोऑफ करणं चांगलंच भोवलं, VIDEO होतोय व्हायरल  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 02:33 PM2024-08-02T14:33:26+5:302024-08-02T14:36:19+5:30

सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या अंधेरी येथे एक कार चालकाचा जीवघेणा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

in andheri ghatkopar link road youngster doing stunt in car arrested by police video goes viral on social media  | कारच्या खिडकीला लटकून तरुणाची स्टंटबाजी; शोऑफ करणं चांगलंच भोवलं, VIDEO होतोय व्हायरल  

कारच्या खिडकीला लटकून तरुणाची स्टंटबाजी; शोऑफ करणं चांगलंच भोवलं, VIDEO होतोय व्हायरल  

Mumbai Andheri Viral Video : सोशल मीडियावर नानाविध प्रकारचे व्हायरल होत असतात. माहितीच्या या महाजाळात कधी काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. हल्ली सोशल मीडियावर वाहनांना खेळणं समजून स्टंटबाजी करण्याचे प्रकार समोर येत आहेत. केवळ लाईक्स आणि शेअर मिळवण्यासाठी तरुण मंडळी हे जीवघेणे स्टंट करतात. पण , असं जीवावर उदार होऊन नको ते साहस करण्याचं धाडस अनेकांना महागातही पडलं आहे. याचाच प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल.


सध्या सोशल मीडियावर मुंबईच्याअंधेरी येथे एक कार चालकाचा जीवघेणा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कार चालक चक्क कारच्या दरवाजाबाहेरुन स्टेअरिंग हाती घेत कार चालवत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. संबंधित कार चालकानं मद्यपान केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत कारच्या खिडकीला लटकत वाहन चालवून केलेली स्टंटबाजी तरुणाच्या अंगलट आली आहे. दरम्यान, ही जीवघेणी स्टंटबाजी करताना या तरूणाची गाडी दुसऱ्या कारवर आदळली आणि त्यात तो जखमी झाला आहे, अशी माहिती मिळत आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अंधेरी-घाटकोपर  लिंक रोडवर असलेल्या फ्लायओव्हरजवळ ३० जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली. त्यामुळे मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवल्याबद्दल स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या या कृत्यामुळे तरुणाने स्वत: सह इतरांचाही जीव धोक्यात घातला. या सगळ्यात स्टंटबाज तरुण किरकोळ जखमी झाला आहे. 

Web Title: in andheri ghatkopar link road youngster doing stunt in car arrested by police video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.