अंधेरीत विद्यार्थ्यांनी घेतली वारीची अनुभूती

By मनोहर कुंभेजकर | Published: June 29, 2023 06:32 PM2023-06-29T18:32:52+5:302023-06-29T18:33:03+5:30

विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष जाहला संगे चिमुकले निघाले पंढरीच्या वारीला असा जणू येथील माहोल होता.

In Andheri, the students got the feel of Wari | अंधेरीत विद्यार्थ्यांनी घेतली वारीची अनुभूती

अंधेरीत विद्यार्थ्यांनी घेतली वारीची अनुभूती

googlenewsNext

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील येथील विद्या विकास मंडळाच्या प्रांगणात शिशुकुल व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित केला होता. विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष जाहला संगे चिमुकले निघाले पंढरीच्या वारीला असा जणू येथील माहोल होता.

 यावेळी छोट्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोषाख परिधान केले होते. विठ्ठल रखुमाई, वारकऱ्यांची वेशभूषा करून हातात टाळ, गळ्यात माळा घालून डोक्यावर तुळशी वृंदावन आणि खांद्यावर पालखी घेऊन विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष करीत विद्यार्थ्यांनी दंग होऊन वारीची अनुभूती घेतली.यावेळी मुलांनी रिंगण घालून विठ्ठलाच्या गाण्याचा आनंद लुटला. 

गेल्या अनेक वर्षांपासून येथे दिंडीची ही परंपरा सुरु आहे. विद्यार्थ्यांना सुसंस्कारित शिक्षण देण्याचे विद्या विकास मंडळ संस्थेचे ध्येय असून मागील साडेसहा दशकांपासून संस्थेने  ते जपले आहे.
 

Web Title: In Andheri, the students got the feel of Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई