Join us

बीकेसीत मुंबई मेट्रोच्या बांधकामस्थळी सापांचा सुळसुळाट, कामगारांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 1:21 PM

मुंबईची भूमीगत मेट्रो म्हणजे मेट्रो लाइनचं ३ चं काम वेगात सुरू आहे. बीकेसी येथे मेट्रो लाइन ३ चं जंक्शन असणार आहे.

मुंबई

मुंबईची भूमीगत मेट्रो म्हणजे मेट्रो लाइनचं ३ चं काम वेगात सुरू आहे. बीकेसी येथे मेट्रो लाइन ३ चं जंक्शन असणार आहे. याच ठिकाणी मेट्रोचं काम सुरू असताना साप आढळून आल्यानं कामगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मुंबई मेट्रो बांधकामस्थळी जमिनीवर असलेल्या बिळात पावसाचे पाणी जाऊन एकाचवेळी अनेक साप बिळाबाहेर पडले. यामुळे बांधकामस्थळी काम करणाऱ्या मजुरांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. 

सर्प मित्रांनी मागील दोन दिवसांत एकूण १० सापांना मुक्त करुन त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. यात आठ विषारी घोणस आणि दोन बिन विषारी नानेटी सापांचा समावेश होता. 

घोणस जातीची मादी एका वेळेस ६० ते ७० पिल्लांना जन्म देते. यामुळे बांधकामस्थळी एकच खळबळ उडाली आहे. परिसरात आणखीही काही साप असल्याचं मजुरांचं म्हणणं आहे. बीकेसी येथील मुंबई मेट्रो लाइन २ ब कास्टींग यार्डशेजारी असलेल्या प्रोजेक्ट ऑफिस परिसरातच विषारी सापाच्या मादीने पिल्ले घातली आहेत. १९ जून रोजी पहिल्यांदा घोणस जातीच्या सापाचे पिल्लू आढळून आले होते. त्यानंतर २२ जून रोजी पुन्हा एक पिल्लू आढळून आल्याने प्रोजेक्ट साइटवरील सुरक्षारक्षकाने याची माहिती सर्पमित्रांना दिली. 

सर्पमित्रांनी पाहणी करुन या परिसरातून चार सापांना मुक्त केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक घोणस जातीचा आणि दोन नानेटी बिनविषारी साप मुक्त करत एकूण १० सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

टॅग्स :मेट्रोमुंबई