Join us

पोषण आहाराअभावी 'ती' ९ दिवसांत दगावली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 10:47 AM

बालिकेच्या मृत्युप्रकरणी तिच्या वडिलांना अटक.

मुंबई :चारकोपमध्ये एका खड्यात पुरलेल्या नवजात बालिकेच्या मृत्युप्रकरणी तिच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. मुलीने दूध पिणे थांबविल्यामुळे पोषक आहाराअभावी ९ दिवसांतच मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी मृतदेह तेथे पुरल्याचे चौकशीत समोर आले.

चारकोपमध्ये मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या नर्सरीमागील मोकळ्या जमिनीच्या खड्ड्यात पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या नवजात मुलीचा मृतदेह आढळून आला. चारकोप पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी जोडप्याविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. या दोघांना एका पेंटरने पाहत त्यांचा पाठलाग केल्यावर ते जवळच्या झुडपात गायब झाले. या ठिकाणी जमीन खोदत खड्डा खणण्यात आला होता, जो त्या जोडप्यानेच खोदल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

• माहितीच्या आधारे पोलिस या जोडप्यापर्यंत पोहोचले आहे. ते रस्त्यावर फुगे विक्री करतात. त्यांच्या चौकशीत मुलीचा जन्म झाल्यानंतर तिने दूध पिण्यास नकार दिला. नऊ दिवसांची असताना तिचा मृत्यू झाला. मृत्यू प्रमाणपत्र न घेताच, कुटुंबीयांनी तिचा मृतदेह पुरल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत्यू प्रमाणपत्र गरजेचे असते, याबाबत माहिती नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मुलीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचेही स्पष्ट झाले. या प्रकरणी चारकोप पोलिस अधिक तपास करत आहे.

• दुसरीकडे अविघ्न पार्क येथील कचयात आढळलेल्या नवजात बालिकेच्या मृत्यूचे गूढ कायम असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीचारकोप