दादरमध्ये ३१ बांधकामे भुईसपाट, ‘आश्रय’मध्ये अडथळा, आश्रय आवास योजनेत ठरत होती अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 10:25 AM2023-11-26T10:25:38+5:302023-11-26T10:26:37+5:30

Mumbai News: पालिकेच्या एफ दक्षिण विभागामार्फत दादरमधील गौतम नगर येथील ३१ अनधिकृत बांधकाम शनिवारी भुईसपाट करण्यात आली. ही बांधकामे पालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या आश्रय आवास योजनेत अडथळा ठरत होती.

In Dadar, 31 constructions are ground floor, a barrier to 'shelter' | दादरमध्ये ३१ बांधकामे भुईसपाट, ‘आश्रय’मध्ये अडथळा, आश्रय आवास योजनेत ठरत होती अडथळा

दादरमध्ये ३१ बांधकामे भुईसपाट, ‘आश्रय’मध्ये अडथळा, आश्रय आवास योजनेत ठरत होती अडथळा

मुंबई - पालिकेच्या एफ दक्षिण विभागामार्फत दादरमधील गौतम नगर येथील ३१ अनधिकृत बांधकाम शनिवारी भुईसपाट करण्यात आली. ही बांधकामे पालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या आश्रय आवास योजनेत अडथळा ठरत होती. अनधिकृत बांधकामांमुळे अनेक वर्षांपासून या योजनेच्या अंमलबजावणीला वेग मिळत नव्हता. परंतु, या कारवाईमुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार असून, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत घरे प्राप्त होऊन निवारा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
पालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त रमाकांत बिरादार आणि एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एफ दक्षिण विभागातील कामगार आणि अधिकारी मिळून तब्बल १३० मनुष्यबळ आणि त्यांच्या मदतीला ३ जेसीबी, २ डंपर, २ वाहने यांच्या साहाय्याने ही कारवाई तडीस गेली, तर पोलिस दलाचे अधिकारी, कर्मचारी मिळून ९५  जणांचे मनुष्यबळ या कारवाईप्रसंगी बंदोबस्तसाठी तैनात होते, अशी माहिती पालिकेने दिली. 

योजनेचा खर्च वाढला 
प्रकल्पाचा ३८२ कोटींचा खर्च ४७२ कोटी रुपयांवर गेला आहे.  मुंबईत सफाई कामगारांच्या एकूण ४६ वसाहती आहेत. त्यातील ३६ वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यानुसार गट सातमध्ये गोरेगाव प्रगतीनगर आणि मिठानगर भागातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करून ३०० चौरस फुटांच्या अनुक्रमे ६९१ व ४१३ अशा एकूण ११०४ सदनिका तयार केल्या जाणार आहेत. ६०० चौरस फुटांच्या १३० व ४२ अशा एकूण १७२ सदनिका बांधण्यात येणार आहेत. कंत्राटासाठी स्काय वे इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

Read in English

Web Title: In Dadar, 31 constructions are ground floor, a barrier to 'shelter'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई