दिवाळीत ओढ लागली गावाकडची; गर्दीने बस आणि रेल्वेस्थानके फुलली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 07:06 AM2023-11-12T07:06:34+5:302023-11-12T07:07:03+5:30

अनेकांना शनिवारपासून दिवाळीच्या सुटीची सुरुवात झाली. 

In Diwali, there was a rush to the village; Buses and railway stations were crowded | दिवाळीत ओढ लागली गावाकडची; गर्दीने बस आणि रेल्वेस्थानके फुलली

दिवाळीत ओढ लागली गावाकडची; गर्दीने बस आणि रेल्वेस्थानके फुलली

मुंबई : दिवाळीसाठी गावाला जाण्याची घाईगर्दी सुरू झाली असून, मिळेल त्या वाहनाने गावचे घर गाठण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. त्यामुळे रेल्वे आणि बसस्थानके गर्दीने फुलली असल्याचे चित्र शनिवारी पाहण्यास मिळाले.

अनेकांना शनिवारपासून दिवाळीच्या सुटीची सुरुवात झाली. पुढील चार दिवस सुटीचे असून गावी घर असणाऱ्या चाकरमान्यांना गावची ओढ लागली आहे. काहींनी आधीच रेल्वे- बसचे आरक्षण करून ठेवले आहे. तर ज्यांना ऐनवेळी सुटी मंजूर झाली, त्यांची मात्र तारांबळ उडाली होती. त्यांचा सर्व भर होता तत्काळच्या तिकिटावर तिकीट वा आरक्षण मिळेल की नाही, याची खात्री नसतानाही अनेकांनी गावी जाण्यासाठी स्थानकांवर गर्दी केली होती. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, वांद्रे आदी रेल्वेस्थानकांत तर मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला बसस्थानकांत प्रवाशांची मोठी होती. दिवाळी, छटपूजेसाठी मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्त आलेले हजारो प्रवासी उत्तरेकडील त्यांच्या राज्यात परत जातात. याशिवाय अनेक जण पर्यटन, व्यवसायानिमित्त प्रवास करतात.

लालपरीवर लक्ष्मी प्रसन्न

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लालपरीला चांगली पसंती मिळत आहे. शुक्रवारी एका दिवसात एसटीने २७ कोटी ६२ लाख कमावले आहेत. तर गेल्या दहा दिवसांत दिवाळी हंगामात एसटी महामंडळाला सुमारे २०० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

मध्य रेल्वेच्या ५०० विशेष गाड्या

दिवाळी, छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊ मध्य रेल्वेतर्फे यंदा ५०० उत्सव विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या विशेष गाड्यांद्वारे सुमारे साडेसात लाख प्रवाशांना दिलासा मिळण आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सव विशेष गाड्या नागपूर, अमरावती आणि कोल्हापूरसाठी चालविण्यात येत आहेत. तर पश्चिम रेल्वेकडून ४०० गाड्या चालवण्यात येणार आहेत.

रेल्वेस्थानकात प्रवाशांची वाढती गर्दी पाहता जास्ती जास्त गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आरपीएफ, जीआरपी जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच गाड्यांची तपासणी केली जात आहे. अधिकाऱ्यांचे २४ तास स्थानकावर लक्ष आहे. डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

दिवाळीत एसटीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बसस्थानकावर गर्दी होत असल्याने जास्तीत जास्त गाड्या सोडण्यावर भर आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा वापर प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. - शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक (वाहतूक) एसटी महामंडळ

मुंबईत दिवसाला ८०० खासगी बसची ये-जा असते. दिवाळीत हा आकडा १५०० पर्यंत पोहोचतो. मात्र, यंदा प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. १५०० १२०० गाड्यांची बुकिंग झाले आहे. एसटीने दिलेल्या विविध सवलतींमुळे पैकी प्रवासी संख्या घटली असू शकते. - हर्ष कोटक, सचिव, बस मालक संघटना

Web Title: In Diwali, there was a rush to the village; Buses and railway stations were crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.