Join us

पैसे खर्चताना काळजी घ्या साहेब; रिकाम्या खुर्च्यांना वारा कशाला ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 9:50 AM

अनेक शासकीय कार्यालयांमध्ये सर्रासपणे वाया जाते वीज.

मुंबई : अनेक शासकीय कार्यालयात कर्मचारी आणि नागरिकांसाठी विजेच्या वापराने सोयी-सुविधा दिलेल्या असतात. मात्र, अशा ठिकाणी वीज वापर करताना काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. अनेकदा दिवसा लाइट सुरू ठेवणे किंवा कर्मचारी नसताना फॅन सुरू ठेवणे असे सर्रास प्रकार घडताना दिसून येतात.

उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी सेवेची अनेक कार्यालये आहेत.  मात्र जेथे नागरिकांचा संबंध नाही. तेथे ही अनेक कार्यालयात दिवसा लाइट सुरू ठेवणे किंवा कर्मचारी नसताना फॅन सुरू ठेवणे, असे प्रकार आढळून येतात. 

फोर्ट येथील ओल्ड कस्टम हाऊस:

 फोर्ट येथील ओल्ड कस्टम हाऊसमध्ये शासनाच्या नागरी योजनेची अनेक कार्यालये आहेत. तलाठी, सेतू , सहकार निबंधक, जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क विभाग आहेत. 

 या विभागात अनेक वेळा दिवसा लाइट सुरू असते. जेथे कर्मचारी नसताना तेथे फॅन सुरू असतो. याशिवाय जेथे नागरिकांची वर्दळ अधिक आहेत. तेथे फॅन किंवा लाइट नसल्याचे दिसून येते. 

वीज वापर जपून करण्याच्या सूचना:

काही शासकीय कार्यालयांमध्ये ऑफिस उघडल्यापासून नागरिकांची वर्दळ असते. अशा वेळी माणसे येत जात असतात. त्यामुळे वारंवार फॅन, लाइट बंद करणे शक्य होत नसेल. जेथे अशा प्रकारे गरज नसतानासुद्धा लाइट, फॅन  सुरू असेल त्या विभागांना वीज वापर जपून करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे उपनगर जिल्हाधिकारी प्रशासन कार्यलयाचे म्हणणे आहे.

१५ ते ३५ हजारांपर्यंत येतात वीज बिल: 

 अनेक ठिकाणी शासकीय कार्यालये एकत्र आहेत. तरीसुद्धा  विभाग प्रमुखांना वीज बिले भरावी लागत.

 साधारण १५ ते ३५ हजारपर्यंत वीज बिले येतात. कार्यालय मोठे असेल तर अधिक बिल येते. 

टॅग्स :मुंबईवीज