अवघ्या काही मिनिटांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला दिव्यांग युवकाला ५ लाखांचा धनादेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 07:39 PM2023-06-14T19:39:26+5:302023-06-14T19:41:02+5:30

मुख्यमंत्र्यांनी संदेशला तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

In just a few minutes, CM Eknath Shinde gave a check of 5 lakhs to a disabled youth | अवघ्या काही मिनिटांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला दिव्यांग युवकाला ५ लाखांचा धनादेश

अवघ्या काही मिनिटांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला दिव्यांग युवकाला ५ लाखांचा धनादेश

googlenewsNext

मुंबई - मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या कामाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा सर्वांना आला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेल्या बांधकाम मजुर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोलेला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाच लाखांचा मदतीचा धनादेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे भारावून गेलेल्या संदेशच्या आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 

मुख्यमंत्री मंत्रालयात बैठकीसाठी आल्यावर त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सामान्य नागरिक येत असतात. प्रत्येकाला भेटल्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालय सोडत नाही. सामान्यांच्या समस्या तातडीने मुख्यमंत्री शिंदे सोडवण्याचा प्रयत्न करतात. आढावा बैठकांमधून प्रशासनाला निर्देशही देत असतात. आज दुपारी १२ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. नियोजित बैठका सुरू झाल्या. लोकप्रतिनीधी, सामान्य नागरिक देखील त्यांना भेटायला आले होते. या गर्दीत पालघर जिल्ह्यातील जव्हारचा संदेश पिठोले त्याच्या वडिलांसह मुख्यमंत्र्यांना भेटायला आला होता. मुख्यमंत्र्यांचे लक्ष व्हिलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले. विधी व न्याय विभागाच्या आढावा बैठकीसाठी जात असताना संदेशजवळ थांबून मुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूस केली आणि ते समिती कक्षात आले. विधी व न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी संदेशला बोलावले आणि त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी संदेशला तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सबंधित अधिकाऱ्यांना बोलावले. तात्काळ संपूर्ण प्रक्रिया झाली. धनादेशावर संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच मुख्यमंत्र्यांसमोरच स्वाक्षरी केली आणि संदेशच्या हातात पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला. बांधकाम मजूर असलेल्या संदेशचा कामावर असताना अपघात झाला त्यात त्याचा एक हात आणि दोन्ही पाय गमावले. संदेशला कृत्रिम पाय, हात बसविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांना समन्वय करण्याच्या सूचनाही दिल्या. व्यवसायासाठी स्टॉल सुरू कर. त्यासाठी पालघर येथे जागा देण्यासाठी मदत करतानाच बांधकाम महामंडळाकडून संदेशला मदत देण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

Web Title: In just a few minutes, CM Eknath Shinde gave a check of 5 lakhs to a disabled youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.