Join us

मढ कोळीवाड्यात लक्ष्मीनारायण नौका खडकावर आढळून फुटली; सात खलाशी मात्र वाचले

By मनोहर कुंभेजकर | Published: September 15, 2023 6:16 PM

नौकेच्या चालकाला सदर अंधारात मढ बेटाच्या पश्चिमेला दोन किलामीटर समुद्रात असलेला काळा खडक समजला नाही

मुंबई-मालाड पश्चिम मढ कोळीवाडा, मधलापाडा येथील राहणारे आकाश कोळी यांची मासेमारी नौका लक्ष्मीनारायण नोंदणी क्रमांक आयएनडी-एमएच 2-एमएच 6223 ही बुधवार दि. १३ सप्टेंबर  रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास मढ तलपशा बंदरातून सदर नौका मासेमारी करीता निघाली होती.

 नौकेच्या चालकाला सदर अंधारात मढ बेटाच्या पश्चिमेला दोन किलामीटर समुद्रात असलेला काळा खडक समजला नाही आणि नौका सदर काश्या खडकाला जाउन धडकून 90 टक्के फुटली, मात्र यातील सात खलाशी मात्र वाचले. मढ दर्यादिप मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष कोळी यांनी लोकमतला दिली. शासनाच्या दुर्लक्षामुळे सदर नौका अपघात होउन ती उध्वस्त झाली असा आरोप त्यांनी केला.

आणि असे वाचले सात खलाशी

नौका खडकावर आपटल्याने मोठ्या पाणी शिरायला लागले, नौकेतील खलाशी घाबरून गेले. काही अंतरावर जाउन नौका पाण्याखाली बुडायला लागली. इंजिनमध्ये पाणी गेल्याने इंजिन बंद पडले.नौकेतील सात खलाशांनी नौकेतील बोये बांधण्यास सुरुवात केली. नौकेवरील खलाशी लाईफ जॅकेटचा आधार घेउन समुद्राशी झुंज देत पोहत होते. मढ किनारी बसलेल्या काही मच्छिमार बांधव हा सर्व प्रकार पाहिला. मच्छिमारांना सदर घटना समजली.अक्षय कोळी यांचा मदतीची हाक देणारा संदेश  संतोष कोळी यांनी गावात पसरवला. मढ गावातील मच्छिमार बांधवांनी त्वरीत आपल्या काही नौका काढल्या आणि पोहत असलेल्या सर्व सात खलाशांना नौकेत उचलून त्यांचा जीव वाचविला अशी माहिती त्यांनी दिली.

काश्या खडकावर दिपस्तंभच नसल्याने होतात अपघात

दि,२८ एप्रिल २०२२ रोजी सदर काश्या खडकावर दिपस्तंब बांधून देण्याची मत्स्यव्यवसाय विभागाकडे मागणी केली होती. भविष्यात सुद्धा होणारच म्हणून लवकरात लवकर येथे दिपस्तंभ बांधून मिळावा म्हणून विनंती अर्ज मढ दर्यादिप मच्छिमार सहकारी सोसायटीने केला होता.परंतू शासनाने दुर्लक्ष केले असा आरोप संतोष कोळी यांनी केला.तसेच हि घटना झाल्यानंतर सदर नौका बाहेर काढण्यासाठी जे मदत कार्य शासनातर्फे व्हायला पाहिजे ते अजून होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.