मढमध्ये नौका खडकावर आदळल्याने फुटली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 12:13 PM2023-09-16T12:13:08+5:302023-09-16T12:13:59+5:30

Mumbai: मासेमारीसाठी गेलेली नौका मालाड येथील मढ तलपशा बंदरात खडकावर आढळल्याने फुटली. लाइफ जॅकेटमुळे आणि मढ गावातील मच्छीमारांच्या प्रसंगावधनामुळे सातही खलाशी वाचले.

In Madh, the boat broke up after hitting a rock | मढमध्ये नौका खडकावर आदळल्याने फुटली

मढमध्ये नौका खडकावर आदळल्याने फुटली

googlenewsNext

मुंबई - मासेमारीसाठी गेलेली नौका मालाड येथील मढ तलपशा बंदरात खडकावर आढळल्याने फुटली. लाइफ जॅकेटमुळे आणि मढ गावातील मच्छीमारांच्या प्रसंगावधनामुळे सातही खलाशी वाचले. या घटनेमुळे टायटॅनिक जहाजाच्या अपघाताची चर्चा काेळीवाड्यात रंगल्याचे पहावयास मिळाले. 

मालाड पश्चिम मढ कोळीवाडा, मधलापाडा येथील राहणारे आकाश कोळी यांची मासेमारी नौका लक्ष्मीनारायण नोंदणी क्रमांक आयएनडी-एमएच 2-एमएच ६२२३ ही बुधवार, दि. १३ सप्टेंबर  रोजी रात्री ९.४५च्या सुमारास मढ तलपशा बंदरातून सदर नौका मासेमारी करीता निघाली होती. अंधरामुळे नौका थेट खडकावर आदळल्याने फुटली आणि पाणी शिरल्याने काही वेळात इंजिन बंद पडले. त्यावेळी घाबरलेल्या खलाशांनी प्रसंगावधान राखत लाइफ जॅकेटच्या आधारे समुद्रात मृत्यूशी झुंज सुरू केली. बचावासाठी सुरू असलेली धडपड मढ किनारी असलेल्या काही मच्छीमारांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित आपल्या नौका काढल्या आणि सातही खलाशांना वाचविले. 

खडकावर दीपस्तंभच नसल्याने अपघात
२८ एप्रिल २०२२ रोजी सदर काश्या खडकावर दीपस्तंब बांधण्याची मत्स्यव्यवसाय विभागाकडे मागणी केली होती. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातानंतर नौका समुद्राबाहेर काढण्यासाठी सरकारकडून त्वरित मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र कुठल्याही प्रकारे मदत मिळाली नाही,  असा आरोप मच्छीमार संघटनेचे संतोष कोळी यांनी केला.

Web Title: In Madh, the boat broke up after hitting a rock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.