लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाट्यगृहाच्या रुपाने भव्य 'स्मारक'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 09:28 AM2022-05-05T09:28:16+5:302022-05-05T09:37:42+5:30

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील लढवय्याला सलाम

in memory of Lokshahir Anna Bhau Sathe in the form of auditorium mumbai rani baugh | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाट्यगृहाच्या रुपाने भव्य 'स्मारक'

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाट्यगृहाच्या रुपाने भव्य 'स्मारक'

googlenewsNext

समीर परांजपे
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य लोकशाहीर व लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने नाट्यगृहाच्या रुपात एक भव्य स्मारक मुंबईत उभे राहिले असून ते नजिकच्या काळात जनतेसाठी खुले होऊ शकते.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लाल बावटा कला पथकातील शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, दत्ता गवाणकर या तिघांनी आपल्या पोवाड्यांनी ही चळवळ सर्वांच्या घराघरात पोहचविली. त्यातील अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने आता जिथे बंदिस्त नाट्यगृह उभारले आहे, तिथे पूर्वी खुला रंगमंच होता.

तिथे तमाशा, लावणी अशा लोककलांचे कार्यक्रम होत असत. मात्र या खुल्या रंगमंचातील कार्यक्रमांच्या आवाजाचा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील  प्राण्यांना त्रास होतो असे लक्षात आल्याने कार्यक्रम कालांतराने बंद करण्यात आले व तिथे बंदिस्त नाट्यगृह बांधावे असा विचार पुढे आला. त्यानुसार मुंबई महापालिकेने २०१८ सालापासून बांधकाम हाती घेतले. हे काम गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाले. 

कुठे आहे स्मारक?
मुंबईत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या लगत.

ही आहेत नाट्यगृहाची वैशिष्ट्ये
या नाट्यगृहाच्या परिसराचे एकुण क्षेत्रफळ पावणे दोन एकराचे आहे. त्यातील पाऊण एकरवर अत्याधुनिक सोयीसुविधांसह हे नाट्यगृह साकारले आहे. मुळचा खुला रंगमंच हेरिटेज क्षेत्रातील वास्तू असल्याने त्याचे सर्व नियम पाळून हे बांधकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या परिसरातील झाडे न ताेडता हे बांधकाम करण्यात आले आहे.

Web Title: in memory of Lokshahir Anna Bhau Sathe in the form of auditorium mumbai rani baugh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई