Join us  

सायनमध्ये पकडले १० कोटींचे अंमली पदार्थ; एनसीबीची कारवाई, एकाला अटक

By मनोज गडनीस | Published: July 19, 2024 5:36 PM

एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख हा अंमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती.

मनोज गडनीस, मुंबई -: मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एम.एस.शेख नावाच्या व्यक्तीला नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी मुंबईतील सायन सर्कल परिसरातून शुक्रवारी अटक केली. तो अंधेरीचा रहिवासी आहे. 

त्याच्याकडे एकूण १० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले आहेत. एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख हा अंमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार तो जेव्हा सायन परिसरात तस्करीसाठी आला होता त्यावेळी त्याला मुद्देमालासह अटक केली. तो एका आंतरराज्यीय टोळीचा सक्रिय सदस्य होता. त्याच्याकडे सापडलेले अंमली पदार्थ हे हैदराबाद येथून मुंबईत वितरणासाठी आले होते. त्याच्याकडे मेफेड्रॉनचा पाच किलोचा साठा आढळून आला. ढळून आला.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस