मुंबईत दहावीचा १५, तर बारावीचा २४ टक्के निकाल, पुरवणी परीक्षेत यंदा निकालात घट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 07:50 AM2023-08-29T07:50:14+5:302023-08-29T07:50:35+5:30
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या परीक्षेनंतर जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत घेतली जाते.
मुंबई : जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये राज्याचा बारावीचा राज्याचा निकाल ३२.१३ टक्के, तर दहावीचा राज्याचा निकाल २९.८६ टक्के लागला आहे. यामध्ये मुंबई विभागाचा दहावीचा निकाल २४.८२ टक्के, तर बारावीचा निकाल २४.८२ टक्के लागला असून, ७ हजार १६५ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत, तर दहावीचा निकाल १५.७५ टक्के लागला असून, २ हजार २४३ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या परीक्षेनंतर जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत घेतली जाते. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी राज्यात नोंदणी केलेल्या ७० हजार २०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६८ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
आकडेवारींची वर्गवारी
बारावीच्या शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेतील १४ हजार ६३२, कला शाखेतील ४ हजार १४६, वाणिज्य शाखेतील ३ हजार २८, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या २८६ आणि आयटीआयच्या ५२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी ३२.२७ टक्के निकाल लागला होता. मुंबई विभागीय मंडळातून २९ हजार १२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी ७ हजार १६५ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. हा निकाल २४.८२ टक्के आहे. विज्ञान शाखेतील ४ हजार ७५२, कला शाखेतील ६८०, वाणिज्य शाखेतील १ हजार ६९५ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १६ आणि आयटीआयच्या १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.