मेट्रोच्या कामात खड्याचा 'खोडा', 'MMRDA'ने भुयारीकरणाचे काम थांबविले; कुटुंबे स्थलांतरित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:54 AM2024-08-26T11:54:55+5:302024-08-26T11:57:41+5:30

गुंदवली ते विमानतळ मेट्रो ७ अ मार्गिका बोगद्याच्या खोदकामादरम्यान अंधेरी पूर्वेकडील सहार रोड परिसरात रस्त्याचा भाग अचानक खचल्याचा प्रकार रविवारी समोर आला.

in mumbai 24 foot hole in andheri sahar road mmrda stops subway work families displaced | मेट्रोच्या कामात खड्याचा 'खोडा', 'MMRDA'ने भुयारीकरणाचे काम थांबविले; कुटुंबे स्थलांतरित

मेट्रोच्या कामात खड्याचा 'खोडा', 'MMRDA'ने भुयारीकरणाचे काम थांबविले; कुटुंबे स्थलांतरित

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गुंदवली ते विमानतळ मेट्रो ७ अ मार्गिका बोगद्याच्या खोदकामादरम्यान अंधेरी पूर्वेकडील सहार रोड परिसरात रस्त्याचा भाग अचानक खचल्याचा प्रकार रविवारी समोर आला. पी. अँड टी. कॉलनी येथे हा प्रकार घडला. ही घटना समोर येताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तत्काळ मेट्रोच्या बोगद्याचे खोदकाम थांबविले असून, घटनास्थळानजीक राहणाऱ्या कुटुंबांना तात्पुरते हॉटेलमध्ये स्थलांतरित केले आहे. 

मेट्रो ७ अ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम सुरू आहे. टनेल बोरिंग मशीनद्वारे हे काम केले जात आहे. त्यादरम्यान शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचानक रस्त्यावर खड्डा पडल्याचे समोर आले. हा खड्डा २४ फूट होता. परिसरातील निवासी इमारतींच्या शेजारीच हा खड्डा पडला. त्यामुळे कंत्राटदाराने सुरक्षिततेचा उपाय म्हणून तत्काळ या भागातील ९ कुटुंबांना नजीकच्या हॉटेलमध्ये स्थलांतरीत केले. या भागात भूगर्भातील पोकळी आणि मातीचा थर कुमकुवत होता. या भागात माती खचून खड्डा पडू शकते, याचा अंदाज यंत्रणांना आधी आला नाही. त्यातून ही घटना घडली. दरम्यान, या भागात खड्डा पडल्याचे समोर येताच कंत्राटदारामार्फत भुयारीकरणाचे काम थांबविण्यात आले आहे. तसेच टनेल

... मगच भुयारीकरणाचे काम सुरू होणार-

माती खचलेल्या भागातील जमिनीची स्थिरता आणि सिमेंट ग्राउटिंग केलेल्या भागातील मातीचा थर योग्यरीत्या बसल्याची खबरदारी घेतली जाणार आहे. तमेत्त या भागातील माती पल्टदा खत्तणार नाही शात्ती खातरजमा झाल्यानंतर भुयारीकरणाचे काम सुरु केले जाणार आहे, असेही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Web Title: in mumbai 24 foot hole in andheri sahar road mmrda stops subway work families displaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.