Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या दिवसांपर्यंत मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात एकूण ६१८ उमेदवारांचे ७७८ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार अखेरचा दिवस होता. या दिवशी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात मिळून एकूण ४२७ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये शहरात १०३ आणि उपनगर जिल्ह्यात ३२४ जणांचा समावेश आहे. शेवटच्या दोन दिवसांतच ५८४ उमेदवारांनी अर्ज भरले.
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मंगळवारी अखेरच्या दिवशी एकूण ५०१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत शेवटच्या दिवसापर्यंत २८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी ८० अर्ज दाखल करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत १४० अर्ज दाखल झाले आहेत.
विधानसभा अर्जधारावी १७सायन काेळीवाडा १७वडाळा १२माहिम ११वरळी १२शिवडी ०८भायखळा २१मलबार हिल ०८मुंबादेवी १२कुलाबा २२अनुशक्तीनगर ३७दिंडाेशी ३२ चांदीवली २७मानखुर्द २९जाेगेश्वरी २५मालाड प. २२अंधेरी पू. २२कुर्ला २०कलिना २० वांद्रे पू. १७वर्साेवा १९विक्राेळी १६मुलूंड १५मानाठणे १४
रायगडमध्ये १४० अर्जरायगड जिल्ह्यात १४० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अलिबागमधून २८, कर्जत १५, महाड ११, पनवेल ३०, पेण १९, श्रीवर्धन २० आणि उरणमधून १७ अर्ज दाखल झाले.
पालघरमध्ये ८० अर्ज पालघर : पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती, तसेच बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात १९, डहाणू मतदारसंघात ११, विक्रमगडमध्ये १४, नालासोपारामध्ये १५, तर वसईमध्ये १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.