मनोज गडनीस,मुंबई : शारजा येथून मुंबईत दाखल झालेल्या एका २८ वर्षीय तरुणाला सीमा शुल्क विभागाने सोने तस्करीच्या प्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडे १ किलो ७ ग्रॅम सोने आढळले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी १० लाख रुपये इतकी आहे.
सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली आहे. मोहम्मद सुहेल असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा कारवारचा आहे. शारजातून मुंबईत येणाऱ्या विमानातील प्रवाशी सोने तस्करीत गुंतल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचला होता. या तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्याची चौकशी केली असता त्याच्या सामानात सोन्याचे बार आणि सोन्याची पावडर आढळून आली.