झोपडपट्टीवासीयांचे जीवन सुधारणार, १,०८८ कोटींची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 09:37 AM2024-07-20T09:37:29+5:302024-07-20T09:42:13+5:30

मुंबईच्या उपनगरातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासह झोपडपट्टी सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांकरिता एकूण एक हजार ८८ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

in mumbai about 1,088 crore to improve the lives of slum dwellers decision in district planning committee meeting  | झोपडपट्टीवासीयांचे जीवन सुधारणार, १,०८८ कोटींची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय 

झोपडपट्टीवासीयांचे जीवन सुधारणार, १,०८८ कोटींची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय 

मुंबई : मुंबईच्या उपनगरातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासह झोपडपट्टी सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांकरिता एकूण एक हजार ८८ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत रस्ते, ड्रेनेज सिस्टम, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, खेळांची मैदाने, अंगणवाड्यांची स्थापना, उद्यानांची निर्मिती, अशा प्रकारच्या कामे तसेच झोपडपट्टी भागांतील बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, आरोग्य सुविधांचा विकास आदी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.

एक हजार ८८ कोटींमध्ये जिल्हा वार्षिक योजना १०१२ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ७१ कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनाअंतर्गत पाच कोटी ७१ लाख रुपयांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार उपनगर जिल्ह्यांतील सर्वसाधारणपणे ४६ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. झोपटपट्ट्यांमधील मूलभूत नागरी सुविधांची कमतरता दूर करतानाच जास्तीत जास्त निधी झोपडपट्टीवासीयांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याबाबत सूचित केले आहे. याअंतर्गत नागरी कामे केली जातील. दरम्यान, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार संजय दिना पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.

चेंबूर येथे महिला-बालभवन नागरी दलितेतर वस्त्यांची सुधारणा ५७४.७८ कोटी, झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर व पुनर्वसन योजनेंतर्गत संरक्षक भिंत बांधकामे ११५ कोटी, कौशल्य विकास कार्यक्रम सहा कोटी, दलितवस्ती सुधार योजना ६५.४८ कोटी, १२.४४ कोटींमध्ये चेंबूर येथील चिल्ड्रन एड सोसायटीच्या मोकळ्या जागेवर महिला व बालभवन बांधण्याचे प्रस्तावित आहे.

पर्यटकांसाठी सोयी-सुविधा-

१) महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय संस्थांचे बळकटीकरण, विविध शासकीय कार्यालये व सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येतील. 

२) पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांसाठी अनुदान ५० कोटींमध्ये भांडूप येथे फ्लेमिंगो पार्क विकसित करून पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, पूर्व उपनगरातील खाडी किनाऱ्यांवरही विविध सुविधा, तसेच आरे येथील छोटा काश्मीर तलाव येथे पर्यटन विकासासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

१५ कोटी क्रीडांगणासाठी -

पोलिस व तुरुंगांसाठी १२.४४ कोटी, व्यायाम शाळा आणि क्रीडांगणांच्या विकासासाठी १५ कोटी, त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी ४.५० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नागरी दलितेतर वस्त्यांची सुधारणा करणे, झोपटपट्टीवासीयांचे स्थलांतर व पुनर्वसन योजनेंतर्गत संरक्षक भिंत बांधकामे, पर्यटन स्थळांच्या विकासासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. लहान मासेमारी बंदराचा विकास, गड-किल्ले, मंदिरे व संरक्षित स्मारके आदींचे संवर्धन, रुग्णालयांसाठी औषधे, साहित्य, यंत्रसामग्री व साधनसामग्रीची खरेदी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटनविषयक सुविधा, सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी अशा जागांभोवती कुंपण भिंती बांधणे, सिग्नल स्कूल, पालिका शाळांना व्यायामशाळा साहित्य पुरविणे, महिलांसाठी शौचालये, छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ अशी कामे करण्यात येणार आहेत. - मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा

Web Title: in mumbai about 1,088 crore to improve the lives of slum dwellers decision in district planning committee meeting 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.