Join us

भाविकांच्या सेवेसाठी पालिकेचे १२ हजार कर्मचारी; चौपाट्यांवर ७६१ जीवरक्षक, ४८ मोटरबोटी तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 11:01 AM

मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई  :  मुंबई महापालिकेने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दीड दिवसापासून १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीपर्यंत विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी पालिकेचे सुमारे १२ हजार अधिकारी-कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष सज्ज आहेत.

यंदा विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर व्यवस्था आहे, अशी माहिती परिमंडळ २ चे उपायुक्त व गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.

मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. विसर्जनासाठी येणारी वाहने चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत, याकरिता चौपाटीच्या किनाऱ्यांवर ४७८ स्टील प्लेट, तर छोट्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले, आदी निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ निर्माल्य कलशांसह २७४ वाहनांचीही व्यवस्था केली आहे, अशी माहिती सपकाळे यांनी दिली.

क्यूआर कोड'चा वापर-

समुद्र, तलाव आणि नद्यांमध्ये पीओपी मूर्तीच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी भाविकांनी कृत्रिम तलावांत गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. यासाठी 'क्यूआर कोड'द्वारेही भाविकांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे.

मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. विसर्जनासाठी येणारी वाहने चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत, याकरिता चौपाटीच्या किनाऱ्यांवर ४७८ स्टील प्लेट, तर छोट्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले, आदी निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ निर्माल्य कलशांसह २७४ वाहनांचीही व्यवस्था केली आहे, अशी माहिती सपकाळे यांनी दिली.

विभागस्तरावर १९२ नियंत्रण कक्ष-

१) महापालिकेच्या विविध 3 विभागांतील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १९२ नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ६६ निरीक्षण मनोरे उभारले आहेत.

२) विविध विकाणी ७२ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६७ रुग्णवाहिकाही सज्ज आहेत. प्रकाशयोजनेसाठी 'बेस्ट'च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी १,०९७ फ्लडलाइट आणि २७ सर्चलाइट लावले आहेत.

३) १२७ फिरती प्रसाधनगृहे सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकागणेशोत्सव 2024