Join us  

मुंबईत ७६ लाख लोकांनी आपलासा केला 'आपला दवाखाना'; आणखी ३७ दवाखाने सुरू करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 9:41 AM

पालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांतून आतापर्यंत ७६ लाख नागरिकांनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांतून आतापर्यंत ७६ लाख नागरिकांनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत. या दवाखान्यांतील वैद्यकीय सुविधांमध्ये दिवसेंदिवस पडणारी भर तसेच नागरिकांच्या घराजवळ, सोयीच्या वेळेत दवाखाने सुरू असल्याने नागरिकांचा त्यांना प्रतिसाद वाढत आहे. दरम्यान, सध्या मुंबईत २४३ 'आपला दवाखाना' सुरू असून, आणखी ३७ दवाखाने सुरू करण्याचे नियोजन आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १७ नोव्हेंबर २०२२ ला आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईकरांना घरानजीक वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी या दवाखान्यांची संख्या वाढविण्यात येत आहे.

या दवाखान्यांत रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. तसेच पुरेशी औषधे नियमितपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केल्या आहेत.

सोनोग्राफी, ईसीजी, सिटी स्कॅन...

१) खासगी डायग्नोस्टिक केंद्रांद्वारे महापालिकेच्या दरात एक्स रे, सोनोग्राफी, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी सुविधा. 

२)  पॉलीक्लिनिक, डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दंतचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय चिकित्सक, त्वचारोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट अशा विविध तज्ज्ञांमार्फत मोफत सल्ला व उपचार मिळत आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाहॉस्पिटल