मुंबई :मुंबई उपनगरीय विभागातील पश्चिम रेल्वेच्याएसी लोकल प्रवाशांच्या अडचणी आता दूर होणार आहेत. एसी लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाली असून एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पश्चिम रेल्वे या मार्गावर ९६ एसी लोकल चालवत आहे. मात्र, तांत्रिक अडचणी निर्माण होऊन लोकल बंद पडण्याच्या समस्येला नागरिकांना वरचेवर तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून या एसी लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
दुरुस्तीची कामे हाती-
१) मुंबई सेंट्रल, कांदिवली आणि विरार येथील ईएमयू कारशेडमधील अधिकारी आणि पर्यवेक्षकांच्या टीमने नीरज वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एसी लोकलमधील वातानुकूलित यंत्रणेत सतत होणाऱ्या बिघाडाची कारणे तपासली.
२) त्यानुसार आता या टीमकडून या मार्गावरील सर्व एसी लोकलची वरचेवर देखभाल आणि दुरुस्ती होत असल्याने लोकल्समधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे.
३) त्यामुळे प्रवाशांमधून येणाऱ्या तक्रारी कमी झाल्या असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.