मुंबई - लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहीता लागू झाली असतानाच मोठ्या उत्साहात साज-या केल्या जाणाºया होळी आणि रंगपंचमी या सणाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीची पावले उचलत शहरात जागोजागी नाकाबंदी करत विशेष बंदोबस्त ठेवला. यादिवशी शहरामध्ये दारुच्या नशेत गाड्या चालविणाºया तब्बल १२४ वाहन चालकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. ४ हजार ५९३ विनाहेल्मेट चालकांसह ४२९ ट्रिपल सीट चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
मुंबई पोलिसांनी बंदोबस्तासह सीसीटिव्ही कॅमेºयांच्या सहाय्याने शहरावर करडी नजर ठेवली. रंगाचा भंग होऊ नये म्हणून होळीच्या सणांदरम्यान रंग आणि गुलाल उधळण्यासोबत रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे, पिशव्या फेकणे, अपशद्ब, वाक्य, गाणे, स्लोगन, चित्र, सिम्बॉल्स यांच्यावर २३ मार्च ते २९ मार्च या काळात शहरात हे बंदी आदेश लागू केले आहेत.
होळी, धुळवडीदरम्यान सणावेळी रविवारी मध्यरात्रीपासून पोलिसांनी कारवाई सुरु केली. सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंबई वाहतूक पोलिसांनी दारुच्या नशेत गाड्या चालविणाºया १२४ मद्यपी चालकांवर ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह मोहीमेतंर्गत कारवाई केली आहे. तसेच ट्रिपल सीट वाहन चालविल्याप्रकरणी १२९, विना हॅल्मेट वाहन चालविल्याप्रकरणी ४ हजार ५९३ जणांवर कारवाई केली आहे.