Join us  

एलएलबी, बीएड अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू; अंतिम यादी १५ जुलैला जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 11:38 AM

एलएल.बी. अभ्यासक्रमासाठी १३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत, तर चार वर्षांच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांसाठी ११ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत.

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पाच वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम आणि बीए, बीएस्सी-बीएड या चार वर्षांच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून, नोंदणीही सुरू केली आहे. एलएल.बी. अभ्यासक्रमासाठी १३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत, तर चार वर्षांच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांसाठी ११ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. एलएलबीच्या विद्याथ्यर्थ्यांनी अर्ज केल्यानंतर प्रवेशाची तात्पुरती यादी १५ जुलै रोजी जाहीर होईल. यासंबंधीच्या तक्रारी १५ ते १७ जुलैदरम्यान दाखल करता येतील.

अंतिम यादी १५, १९ जुलैला जाहीर होणार-

एलएलबीची अंतिम यादी १९ जुलैला जाहीर होणार आहे. बीए, बीएस्सी बीएड अभ्यासक्रमासाठीची अंतिम यादी १५ जुलैला जाहीर होणार आहे.

असे आहे वेळापत्रक-

एलएल.बी. पाच वर्षे-

१) ऑनलाइन अर्ज भरणे - १३ जुलैपर्यंत

२) कागदपत्रे तपासणी व अर्ज कन्फर्म - १४ जुलैपर्यंत

तात्पुरती यादी- १५ जुलै-

१) हरकती व सूचना- १५ ते १७ जुलै

२)  अंतिम यादी- १९ जुलै

बीए/बीएस्सी-बीएड-

१) ऑनलाइन अर्ज भरणे - ११ जुलैपर्यंत

२) कागदपत्रे तपासणी व अर्ज कन्फर्म- १२ जुलैपर्यंत

३) तात्पुरती यादी- १३ जुलै

४) हरकती व सूचना- १२ ते १४ जुलै

५) अंतिम यादी- १५ जुलै

टॅग्स :मुंबईविद्यार्थी