Join us  

दसऱ्यानंतर पावसाचे मुंबईतून होणार सीमोल्लंघन; यंदा शहरावर ३ हजार मिलीमीटरचा जलाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 9:41 AM

परतीचा पाऊस अद्याप गुजरात आणि राजस्थानातच असला तरी आता जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने संपले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : परतीचा पाऊस अद्याप गुजरात आणि राजस्थानातच असला तरी आता जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने संपले आहेत. पावसाळ्याच्या या चार महिन्यात मुंबईत ३ हजार ९० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.      

दरम्यान, मुंबईत परतीच्या पावसाचा जोर दसऱ्यापर्यंत राहील. शिवाय दसऱ्यापर्यंत रोज सायंकाळच्या वेळेला मुंबईत पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांकडून देण्यात आली.

१) जून- 

मुंबई ३५०ठाणे ५७७पालघर ६९५

२) जुलै-

मुंबई-  १,७०३ठाणे - १,६८१पालघर- १,३६८

३) ऑगस्ट-

मुंबई - ३८२ठाणे -५७७पालघर - ६६३

४) सप्टेंबर-

मुंबई-६५५ठाणे- ५९७पालघर- ६६९

हलक्या पावसाच्या सरी-

मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारसह रविवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. ७ ऑक्टोबरदरम्यान परतीचा पाऊस मुंबईत दाखल होईल. त्यानंतर, १२ ऑक्टोबरपर्यंत मुंबईत अगदी हलक्या पावसाच्या सरी कोसळतील. त्यानंतर मात्र मान्सून मुंबईतून काढता पाय घेईल. या काळात पावसाची एखाद दुसरी मोठी सर येण्याची शक्यता आहे.- अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक

जून ते सप्टेंबर पडलेला एकूण पाऊस (मिमी)-

१) सांताक्रूझ- ३,०९०

२) कुलाबा - २,६४२

३) पालघर- ३,३९५

४) वसई- २,७९३

५) कांदिवली- ३,२९०

६) आरे- ४,४२०

७) परेल- ३,६१५

८) ठाणे- ३,४३२

९) भिवंडी- २,७९७

१०) कल्याण- २,२२०

११) कोपरखैरणे- ३,५४१

१२) पनवेल- ३,६२३

१३) उरण- २,९७९

१४) कर्जत- ४,३३७

टॅग्स :मुंबईपाऊस