नव्या मोनोसाठी दोन महिने थांबा, चाचणीनंतर सेवेत, २ हजार कि.मी चालवून आढावा घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 11:27 AM2024-06-15T11:27:36+5:302024-06-15T11:37:13+5:30
चेंबूर ते संत गाडगे महाराजचौक या मोनो रेल्वेमार्गासाठी दाखल झालेल्या नव्या गाडीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत.
मुंबई : चेंबूर ते संत गाडगे महाराजचौक या मोनो रेल्वेमार्गासाठी दाखल झालेल्या नव्या गाडीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. पुढील दोन महिने तब्बल दोन हजार किलोमीटर ही गाडी चालवून तिची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर ही गाडी प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.
मोनोच्या ताफ्यात एकूण आठ गाड्या आहेत. त्यापैकी सहा गाड्यांद्वारे प्रवाशांना सेवा दिली जात आहे. या मार्गावर दर १८ मिनिटांनी एक या प्रमाणे दिवसभरात मोनो रेल्वेच्या ११८ फेऱ्या होत आहेत. परिणामी प्रवाशांना गाडीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावर गाड्यांच्या फेऱ्या वाढवता याव्यात, यासाठी एमएमआरडीएकडून आणखी १० गाड्यांची खरेदी केली जात आहे. या नव्या गाड्या सेवेत दाखल झाल्यानंतर दर पाच मिनिटांनी गाड्या चालवणे शक्य होणार असून, त्यांच्या फेऱ्यांची संख्या २५० पर्यंत पोहोचेल. नवीन १० गाड्यांपैकी पहिली गाडी वडाळा येथील डेपोमध्ये दाखल झाली आहे. महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) सध्या या गाडीच्या ऑसिलेशन, सुरक्षा चाचण्या सुरू असून, त्या मध्यरात्री १२ ते पहाटे
१) खरेदी केल्या जाणाऱ्या नवीन गाड्या- १०
२) कंत्राटाची किंमत - ५९० कोटी रुपये
३) प्रत्येक गाडीची किंमत सुमारे ५८.९ कोटी रुपये
४) एका गाडीला डबे - ४
दरम्यान, सुट्ट्यांच्या दिवशी दोन गाड्यांच्या दरम्यान नवी गाडी चालवून चाचणी घेतली जात आहे. पुढील दोन महिने चाचण्या घेतल्यानंतर कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) हे गाडीची तपासणी करून सुरक्षा प्रमाणपत्र देतील. त्यानंतरच ही गाडी मार्गिकेवर धावणार आहे. दरम्यान, पहिल्या गाडीच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित मोनो गाड्या मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे पुढील गाड्या १५ ऑगस्टनंतर येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.