लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईविद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना मुदतवाढ दिली आहे. आता या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
नोकरी तसेच अन्य कारणांमुळे उच्चशिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाइन माध्यमातून शिक्षण पूर्ण करण्याची संधी असते. यंदा या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी एमए इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क, एम.कॉम. अकाउंट्स, एम.कॉम. व्यवस्थापन, एमएस्सी गणित, एमएस्सी माहिती तंत्रज्ञान, एमएस्सी संगणकशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.
विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी संबंधित वेबसाइटवर अर्ज सादर करता येणार आहेत. मुंबई विद्यापीठाने एमसीए आणि एमएमएसच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसही १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
पदव्युत्तर प्रथम वर्षासाठीचे अभ्यासक्रम-
पदव्युत्तर प्रथम वर्षासाठीचे एम.ए. शिक्षणशास्त्र आणि द्वितीय वर्ष एम.ए. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क एम.कॉम. अकाउंट्स, एम.कॉम. व्यवस्थापन, एमएस्सी गणित, एमएस्सी माहिती तंत्रज्ञान, एमएस्सी संगणकशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी अर्ज संबंधित वेबसाइटवर भरता येतील.
पदवीसाठीचे अभ्यासक्रम-
पदवीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम. (अकाऊंट अँड फायनान्स), बी.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), बी.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश अर्ज संबंधित वेबसाइटवरून भरता येतील.