उंदीर पडले पाच लाखांना; साफसफाई एजन्सीला दंड, सीएसएमटी स्थानकातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 11:22 AM2024-07-25T11:22:24+5:302024-07-25T11:29:51+5:30

सीएसएमटीच्या लॉबीमध्ये सोमवारी मरून पडलेल्या उंदरांच्या दुर्गंधीमुळे लॉबीच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले.

in mumbai at csmt due to the stench of a dead rat in motorman cabin five lakhs penalty to cleaning agency | उंदीर पडले पाच लाखांना; साफसफाई एजन्सीला दंड, सीएसएमटी स्थानकातील प्रकार

उंदीर पडले पाच लाखांना; साफसफाई एजन्सीला दंड, सीएसएमटी स्थानकातील प्रकार

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील मोटरमन, गार्डच्या केबिनमध्ये मरून पडलेल्या उंदिराच्या दुर्गंधीमुळे कर्मचाऱ्यांना फलाटावर टेबल मांडून काम करावे लागले. हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी उचलून धरल्यानंतर प्रशासनाकडून साफसफाई करणाऱ्या एजन्सीला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, बुधवारीही लॉबीबाहेर किंचित दुर्गंधी जाणवत होती.

सीएसएमटीच्या लॉबीमध्ये सोमवारी मरून पडलेल्या उंदरांच्या दुर्गंधीमुळे लॉबीच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले. कर्मचाऱ्यांनी फलाटावर काम सुरू केले होते.

दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांना त्रास-

१) फलाटावर दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांना नाकाला रूमाल लावावा लागत होता. मंगळवारी लॉबीची साफसफाई करण्यात आली असली, तरी दुर्गंधी कायम होती.

२) परिणामी कर्मचारी आणि प्रवासी त्रस्त झाले होते. बुधवारी परिस्थिती सर्वसाधारण असली तरी लॉबीत किंचित दुर्गंधी येत होती.

Web Title: in mumbai at csmt due to the stench of a dead rat in motorman cabin five lakhs penalty to cleaning agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.