मुंबई : सायन पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शिव उड्डाणपूल मध्य रेल्वेने धोकादायक घोषित केला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरून अवजड वाहने आणि २.८० मीटरपेक्षा उंचीच्या वाहनांसाठी वाहतूक बंदी करण्यात आली आहे.
१७ जुलै रोजी मोहरमनिमित्त वांद्रे, कुर्ला, धारावीसह अन्य भागांतून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर या भागांत नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी या भागातील मार्गांवरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. मोहरम सणाच्या निमित्ताने दरवर्षी माहीम रेती बंदर येथे ताजिया विसर्जित करण्यासाठी मिरवणुका काढण्यात येतात.
मिरवणुकांचे आयोजन-
१) मोहरमच्या मिरवणुकांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. यंदाही अशाप्रकारच्या मिरवणुकांचे आयोजन होत असल्याने काही मार्गांवर गर्दी होऊ शकते.
२) नागरिकांनी १७ जुलै रोजी दुपारी ४ वाजल्यापासून १८ जुलै रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत या कालावधीत ‘जी उत्तर’ विभागातील ‘टी जंक्शन’ ते कला नगर, ६० फूट रस्ता, ९० फूट रस्ता, एस. एल. रहेजा मार्ग, माहीम कॉज वे या मार्गावरून वाहन नेणे किंवा प्रवास करणे शक्यतो टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.