Join us

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला तरच ‘स्वाधार’चा लाभ! महाआयटीच्या पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:31 AM

मुंबई विभागात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४२ वसतिगृहे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शासकीय वसतिगृहातील मुला-मुलीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी शासन निर्णयात नमूदप्रमाणे रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट वितरित केले जाते.

शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असलेल्या मात्र वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती नवबौद्ध विद्यार्थ्यांपैकी १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचा आधार संलग्न बँक खात्यावर रक्कम वितरित करण्यात येते.

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज सादर केलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा. याबाबतची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. - वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण, मुंबई 

सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकूण ४२ वसतिगृहे-

मुंबई विभागात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४२ वसतिगृहे आहेत. स्वाधारसाठी अर्ज भरताना पोर्टलचा वापर करावा. स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी महाआयटीच्या पोर्टलवर अर्ज करावा लागतो.

महाआयटी पोर्टलवर अर्ज करा-

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना पोहोचाव्यात या हेतूने मुंबई विभागातील, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात, तालुक्यात ३१ ऑगस्टपर्यंत मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात-

१) इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग इत्यादी समाजघटकासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

२) या विभागांतर्गत महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ इत्यादी महामंडळे, संस्थांमार्फत सुद्धा विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.

टॅग्स :मुंबईराज्य सरकार