Join us

बेस्ट ‘महालक्ष्मी’च्या सेवेत; भक्तांसाठी विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 10:07 AM

मुंबई शहरातील ‘महालक्ष्मी यात्रा’ ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत साजरी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शहरातील ‘महालक्ष्मी यात्रा’ ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत साजरी होणार आहे. या यात्रेदरम्यान महालक्ष्मीच्या  दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. भक्तांच्या सोयीसाठी बेस्टकडून उपनगरातून तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथून विशेष बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. शहराच्या विविध भागांतून महालक्ष्मी मंदिरमार्गे प्रवर्तित होणाऱ्या विद्यमान बसमार्गावरील फेऱ्यांमध्ये आवश्यकतेप्रमाणे वाढ करण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांची नियुक्ती-

१) महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी भाविकवर्ग मोठ्या प्रमाणावर भायखळा व महालक्ष्मी स्थानक येथे उपनगरीय रेल्वेने येतात. तेथून बेस्ट गाड्यांमधून प्रवास करतात. 

२) लगतच्या बसआगारांमधून बस निरीक्षक, वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही बेस्टने स्पष्ट केले. उपनगरीय प्रवाशांसाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथून महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यासाठी गर्दीच्या वेळी लालबाग, चिंचपोकळी व महालक्ष्मी रेल्वे स्थानकमार्गे नवरात्रीच्या कालावधीत बससेवा चालविण्यात येणार आहेत. 

या मार्गावर अतिरिक्त बस धावणार-

क्रमांक          पासून                                   पर्यंत 

१) ३७        जे मेहता मार्ग                    कुर्ला स्थानक पश्चिम   

२) ५७       वाळकेश्वर                          प्र. ठाकरे उद्यान शिवडी 

३) १५१      वडाळा आगार                      ब्रीच कँडी रुग्णालय 

४) ए६३     भायखळा स्थानक प.              ब्रीच कँडी रुग्णालय 

५) ए७७     भायखळा स्थानक प.            ब्रीच कँडी रुग्णालय 

६) ए७७     सातरस्ता                              ब्रीच कँडी रुग्णालय 

७) ८३       ऑपेरा हाऊस                            सांताक्रूझ आगार 

८) ए३५७     मुंबई सेंट्रल आगार                शिवाजी नगर आगार 

९) विशेष      प्र. ठाकरे उद्यान शिवडी       महालक्ष्मी मंदिर 

टॅग्स :मुंबईबेस्ट