Join us

बेस्टच्या प्रवासी संख्येला १५ वर्षांत घरघर, बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी संख्येत घट 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 10:25 AM

अपुऱ्या बसची संख्या, त्यामुळे बस थांब्यांवर लागणाऱ्या रांगा, वाहतूक कोंडी, तासन्तास करावी लागणारी बसची प्रतीक्षा या समस्यांमुळे प्रवासी कंटाळले आहेत.

मुंबई: अपुऱ्या बसची संख्या, त्यामुळे बस थांब्यांवर लागणाऱ्या रांगा, वाहतूक कोंडी, तासन्तास करावी लागणारी बसची प्रतीक्षा या समस्यांमुळे प्रवासी कंटाळले असून, त्याचा फटका बेस्ट उपक्रमाला बसू लागला आहे. २००९ मध्ये असलेली बेस्टची ४४ लाखांची प्रवासी संख्या आता २०२४ पर्यंत ३५ लाखांवर येऊन पोहोचली आहे. मागील १५ वर्षात नऊ लाख प्रवासी घटल्याचे असून, त्याचा साहजिकच त्याचा मोठा परिणाम महसुलावरही होत आहे.

'बेस्ट बचाओ'-

मुंबईच्या कानाकोपऱ्याशी जोडणारी भक्कम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून बेस्टचा नावलौकिक आहे; मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाला विविध कारणांमुळे घरघर लागली आहे. बेस्ट उपक्रमाकडून बस सेवेकडे गंभीरपणे नक्ष देण्याची गरज आहे.

भविष्यात मुंबईत आणखी काही मार्गावर मेट्रो व मोनो रेल्वे सुरू होतआहे. त्यावेळी बेस्ट समोरील आव्हाने अधिकचवाढणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, बेस्टबसचा ताफावाढविण्यासाठी बेस्टसंघटनांनीही बेस्ट बचाओ' मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम मुंबईकरापर्यंत पोहोचवण्यासाठी आता ते गणेशोत्सव मंडळाचीही मदत घेणार आहेत.

प्रवाशांच्या त्रासात भर-

दादर ते प्रभादेवी, वरळी तसेच वरळी ते भायखळा, सीएसएमटी ते प्रतीक्षानगर, जिजामाता उद्यान, नरिमन पॉइंट, वांद्रे पूर्व, पश्चिम, बोरिवली, वडाळा आदी बऱ्याच मार्गावर बसगाड्यांच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची व प्रकल्पांची कामे सुरू असल्यामुळे बस मार्गही बंद करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना वळसा घालून किंवा इतर बेस्ट मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :मुंबईबेस्टराज्य सरकार