मुंबई : कर्नाक बंदर पुलाच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० वाजेपर्यंत मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुख्य मार्गावर लोकल भायखळा, परळपर्यंतच चालविल्या जातील. तर, हार्बर मार्गावर लोकल वडाळा स्थानकापर्यंतच चालविली जाईल.
या ब्लॉकमुळे सीएसएमटी येथून शेवटची कसारा लोकल १२:१४ वाजता सुटेल; तर सीएसएमटीसाठी शेवटची लोकल कल्याण येथून १०:३४ वाजता सुटेल. डाउन मार्गावरील सकाळची पहिली लोकल सीएसएमटी येथून कर्जतसाठी ४.४७ वाजता सुटेल, तर अप मार्गावरील सीएसएमटीसाठी पहिली लोकल ठाणे येथून पहाटे ४ वाजता सुटेल.
हार्बर मार्गावर पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री १२:१३ वाजता सुटेल. अप मार्गावर सीएसएमटीसाठी शेवटची लोकल पनवेलहून १०:४६ वाजता सुटेल. सकाळी सीएसएमटी येथून पहिली लोकल ४:५२ वाजता सुटेल. सीएसएमटीसाठीची पहिली लोकल वांद्रे येथूून ४:१७ वाजता सुटेल.
या एक्स्प्रेस दादरपर्यंत-
१) हावडा- सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस
२) अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस
३) मडगाव- सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस
४) मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस
५) भुवनेश्वर- सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस
६) हावडा- सीएसएमटी मेल.