Join us

मनपा ॲक्शन मोडवर, 'एकच मिशन, खड्डे बुजवा' ; प्रत्येक वॉर्डात दुय्यम इंजिनीअरची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:13 AM

दोन-तीन मोठ्या पावसानंतर शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा ‘लोकमत’ने समाचार घेतल्यानंतर महापालिकाही ॲक्शन मोडवर आली आहे.

मुंबई : दोन-तीन मोठ्या पावसानंतर शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा ‘लोकमत’ने समाचार घेतल्यानंतर महापालिकाही ॲक्शन मोडवर आली आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली आहे.

खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक वॉर्डात दुय्यम इंजिनीअरची नियुक्ती केली आहे. खड्ड्यांच्या तक्रारींची दखल घेणे आणि तत्काळ  खड्डे बुजवणे हे त्यांचे मुख्य काम आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गासह मुंबईच्या सर्व विभागांत  मिळून ५,३९६ खड्डे पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ५,१९४ ठिकाणचे खड्डे बुजवण्यात आले आहेत. पालिकेच्या आकडेवारीवरून हा लेखाजोखा समोर आला आहे. 

खड्ड्यांमध्ये टॉप फाइव्ह विभाग-

के-पश्चिम, अंधेरी,  जी-उत्तर, माटुंगा, पी-दक्षिण, गोरेगाव, पी-उत्तर मालाड     हे जास्त खड्डे पडलेले टॉप-५ विभाग आहेत. तुलनेने कमी खड्डे एच-पूर्व वांद्रे, सांताक्रूझ, टी, मुलुंड, सी, काळबादेवी, एच-पश्चिम खार आणि  एन,  घाटकोपर   या पाच विभागांत तुलनेने कमी खड्डे पडले आहेत. 

पश्चिम एक्स्प्रेस वेवर सर्वाधिक खड्डे-

पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर सर्वात जास्त खड्डे पडले आहेत. पूर्व द्रूतगती महामार्ग हा सायन  ते मुलुंड    आणि पश्चिम द्रूतगती महामार्ग हा वांद्रे ते दहिसर असा  आहे. या दोन्ही महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असते. मुंबई बाहेर जाणारी आणि मुंबईत येणारी वाहने याच महामार्गावरून ये-जा करत असतात.  

आयुक्तांचे विशेष लक्ष-

१) यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांच्या तक्रारींची दखल घेऊन तत्काळ भरण्यासाठी आयुक्त भूषण गगराणी  यांनी अभिनव पद्धत आणली आहे. 

२)  फक्त याच कामासाठी प्रत्येक विभागात दुय्यम इंजिनिअरची नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

३)  या इंजिनिअरनी फक्त हेच काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे खड्डे पडले असतील, मात्र ते भरण्याचा वेगही यंदा वाढला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

१) पूर्व द्रूतगती महामार्गावरील खड्डे - १,०८९ तसेच बुजवले खड्डे -  ९७४ 

२) पश्चिम द्रूतगती महामार्गावरील खड्डे -१,८६५ तसेच बुजवलेले खड्डे- १,८६५ 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाखड्डे