Join us

या महिन्यात दोनदा अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 10:26 AM

पावसाने जूनच्या तुलनेत जुलैमध्ये कसर भरून काढली.

मुंबई : पावसाने जूनच्या तुलनेत जुलैमध्ये कसर भरून काढली. आता हवामानातील बदलामुळे १५ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कमी राहील. १५ ऑगस्टनंतर मात्र पाऊस पुन्हा एकदा जोर पकडेल. १८ ते ३१ ऑगस्टदरम्यान दोनवेळा मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. 

जुलै महिन्यात सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद-

जुलैमध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. ८ जुलैला सकाळी मुंबईत २४ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यानंतर १९ ते २६ जुलैपासून बहुतांश भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

हवामानात बदलामुळे -

१५ ऑगस्टपर्यंत मान्सून किंचित विश्रांती घेईल; परंतु त्यानंतर महिना संपेपर्यंतच्या कालावधीत दोन वेळा मोठी पर्जन्यवृष्टी होईल; परंतु त्यावेळी पावसाची तीव्रता किती असेल? हे हवामानातील बदलावर अवलंबून असेल. - अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक

नोंद किती?

१) जून महिन्यात सुमारे ५२० मिमी पाऊस पडण्याची शक्यता होती. 

२) सांताक्रुझ येथे ३५० मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे ५०७ मिमी पावसाची नोंद झाली. 

३) जूनमध्ये नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ५५० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

टॅग्स :मुंबईहवामानपाऊस