Join us

कांदिवलीत गटाराच्या कामामुळे रस्त्याची चाळण; डागडुजीअभावी नागरिक, वाहन चालक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:55 AM

बंदरपाखाडी येथील गौरव गार्डन ते गणेश चौक हा रहदारीचा रस्ता आहे. तेथे भूमिगत गटाराचे काम करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत.

मुंबई : कांदिवली येथील बंदरपाखाडी येथील गौरव गार्डन ते गणेश चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या भूमिगत सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामामुळे येथील रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये- जा करणे नागरिक आणि वाहनचालकांना त्रासदायक होत आहे.

बंदरपाखाडी येथील गौरव गार्डन ते गणेश चौक हा रहदारीचा रस्ता आहे. तेथे भूमिगत गटाराचे काम करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. काम सुरू असताना मोठे डम्पर, जेसीबी आदी जड वाहने त्या रस्त्यावरून जात होती. त्यामुळे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यालगत गेले काही महिने सुरू असलेल्या भूमिगत सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे दुरवस्था झाल्याची माहिती मनसेचे पावसाआधी या रस्त्याची डागडुजी न झाल्यास स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागेल. खड्ड्यांमुळे जीवितहानी अथवा अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन येत्या चार दिवसांत युद्धपातळीवर हा रस्ता व्यवस्थित बनवून द्यावा. अन्यथा या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल.- दिनेश साळवी

चारकोप विधानसभा विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी दिली. साळवी यांनी याबाबत पालिकेच्या आर दक्षिण विभागाकडे तक्रार केली आहे.

सांडपाणी वाहिन्यांचे काम कंत्राटदाराला देण्यात आले होते. काम झाल्यानंतर रस्ता दुरुस्त करणे ही त्याची जबाबदारी होती. मात्र, हे काम रखडल्याने रस्त्याची दुरवस्था कायम आहे.

टॅग्स :मुंबईकांदिवली पूर्वचारकोप