Join us

वीजग्राहकांच्या तक्रारी ॲपमुळे लवकर सुटणार; वीज गेली तर अशी करा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 10:31 AM

फिल्डवर काम करणाऱ्या ‘अदानी’च्या वीज कामगारांसाठी ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : फिल्डवर काम करणाऱ्या ‘अदानी’च्या वीज कामगारांसाठी ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना वीजग्राहकांच्या तक्रारी लवकर सोडवता येत आहेत. यात नियोजन, वाटप, प्रत्यक्ष काम व्यवस्थित संपवणे, मालमत्तेची देखरेख आणि रक्षण करणे, पाहणी करणे, सुरक्षाविषयक कामे करणे आदींचा समावेश आहे. एखादे काम कोणाला सोपवायचे इथपासून ते पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांच्या प्रतिक्रियांचा आढावा घेणे, ही सर्व कामे या ॲपमुळे सोपी होत आहेत.

एखाद्या कामाशी संबंधित सर्व बाबी करणे आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा तपशील सादर करणे, यासह सर्व गोष्टी एकाच ठिकाणी होत आहेत. बाहेरील कामगारांना दैनंदिन वेळापत्रक सांभाळता येते. आपल्या कामाचा तपशील मिळवता येतो. सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी संवाद साधता येतो. ॲपमधील लोकेशन सेवेच्या आधारे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीही जाता येते. कामाच्या प्रगतीचा तपशील मिळत असल्यामुळे तसेच आपली प्रतिक्रियाही नोंदविता येते, अशी माहिती अदानी इलेक्ट्रिसिटीकडून देण्यात आली.

आमच्या विभागात वीज नुकतीच गेल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामासंदर्भात मला नियमितपणे सर्व तपशील मिळत होता. आमचा सतत संवाद असल्यामुळे वीज येईपर्यंत मला पूर्ण माहिती मिळाली. - सुरेश पाटील, वीजग्राहक, गोरेगाव पूर्व

टॅग्स :मुंबईवीज