मनोहर कुंभेजकर, मुंबई : मरोळ ते साकीनाका भागातील कृष्णलाल मारवाह रोडलगतच्या पिकनिक पुलाचे बांधकाम गेली ६ वर्षे रखडले असून त्याची दखल कुणीच घेत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये काम न होण्यावरून आपापसात भांडणे तसेच संताप व तणाव अनुभवयाला मिळत आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढून मुंबई महानगरपालिका के पूर्व विभाग कार्यालयावर व नियुक्त केलेल्या कंत्राटाराच्या विरोधात उत्सफूर्त मोर्चा काढला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्थानिक नागरिकांनी या पिकनिक पूलाचे काम लवकरात लवकर झाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.