Join us  

रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याने खळबळ, धारावीतील घटना; 'सीसीटीव्ही'द्वारे तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 10:44 AM

धारावीत अनोळखी व्यक्तीने रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई : धारावीत अनोळखी व्यक्तीने रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याने खळबळ उडाली आहे. ते अर्भक मृत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी धारावीपोलिसांनी गुन्हा नोंदवत सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे. रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याची गेल्या पाच दिवसांतील ही दुसरी घटना असून, तपास सुरू आहे.

धारावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश पाटकर यांच्या फिर्यादीनुसार, धारावी टी जंक्शन येथील कलानगरहून शीवकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या शेजारी गुरुवारी अर्भक सापडले होते.

१) अर्भकाच्या मृत्यूनंतर विल्हेवाट लावण्यासाठी तेथे फेकण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात यापूर्वी अंधेरीत सापडले होते .

२)  यापूर्वी अंधेरी येथे दोन दिवसांचे बाळ रस्त्याच्या कडेला सापडले होते. या बाळाला जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अर्भकाला सोडून पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तीविरोधात वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू आहे.

३) धारावी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैद्यकीय तपासणीनंतरच ते स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने धारावी पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

टॅग्स :मुंबईधारावीगुन्हेगारीपोलिस