अठरा लाख कुटुंबांना मिळणार रवा, चणाडाळ, साखर, तेल; गौरी-गणपतीनिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:30 AM2024-07-31T11:30:42+5:302024-07-31T11:35:21+5:30

गौरी-गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा मिळणार आहे. राज्य सरकारकडून अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हे वाटप होणार आहे.

in mumbai eighteen lakh families will get rava chanadal sugar and oil anandacha shidha from the state government on the occasion of ganesh festival | अठरा लाख कुटुंबांना मिळणार रवा, चणाडाळ, साखर, तेल; गौरी-गणपतीनिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा

अठरा लाख कुटुंबांना मिळणार रवा, चणाडाळ, साखर, तेल; गौरी-गणपतीनिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा

मुंबई : गौरी-गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा मिळणार आहे. राज्य सरकारकडून अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हे वाटप होणार आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगरातील एकूण पाच परिमंडळातील तब्बल १७ लाख ८९ हजार ७५३ लाभार्थी निश्चित करण्यात आले आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगरातील एकूण ५ परिमंडळातील पात्र व शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपतीसाठी आनंदाचा शिध्याचे वितरण दि. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या    कालावधीत करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

काय मिळणार?

१०० रुपयांत साखर, खाद्यतेल, रवा व चणाडाळ, एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल या चार जिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा संबंधित पात्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगरातील एकूण पाच परिमंडळात आनंदाचा शिध्याचे तब्बल सतरा लाख ८९ हजार ७५३ लाभार्थी निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थी १५५५४ असून, प्राधान्य शिधापत्रिकाधारक लाभार्थी १७ लाख ६४ हजार १९९ आहेत. मुदतीत या योजनेचा लाभ घ्यावा. - अनिल टाकसाळे, उपनियंत्रक शिधावाटप, चर्चगेट, मुंबई

कोणत्या भागात किती लाभार्थी ?

१) परिमंडळ - अ            
   अंत्योदय - ७०८
    प्राधान्यक्रम  -१,५८,६०७ 
    एकूण- १,५९,३१५                   

२) परिमंडळ - ड         
    अंत्योदय- १७५
    प्राधान्यक्रम  - २,०६,६२९
     एकूण- २,०६,८०४

३) परिमंडळ -  ई
    अंत्योदय- २०३५
     प्राधान्यक्रम  - ४,६५,१३०    
     एकूण- ४,६७,१६५    

४) परिमंडळ -  ग       
    अंत्योदय-  १५२८
    प्राधान्यक्रम  - २,५७,९८४
     एकूण- २,५९,५१२

५) परिमंडळ - फ    
    अंत्योदय- १५,१०८
     प्राधान्यक्रम  - ६,७५,८४९
     एकूण- ६,८६,९५७

Web Title: in mumbai eighteen lakh families will get rava chanadal sugar and oil anandacha shidha from the state government on the occasion of ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.