मुंबईत १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार, असे असतील नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 07:49 AM2022-08-29T07:49:57+5:302022-08-29T07:50:31+5:30

Milk price In Mumbai: अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत.

In Mumbai, from September 1, milk will cost Rs 7 | मुंबईत १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार, असे असतील नवे दर

मुंबईत १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार, असे असतील नवे दर

Next

मुंबई : अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. चाऱ्याचे दर दुप्पट झाले आहेत. तूर, हरभऱ्याच्या किमती १५ ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे दरवाढ केल्याचे अध्यक्ष सी. के. सिंह आणि संयोजक कासम काश्मीर यांनी सांगितले. संघाची रविवारी बैठक झाली. ही भाववाढ १ सप्टेंबर २२ पासून २८ फेब्रुवारी २३ पर्यंत लागू असतील.

Web Title: In Mumbai, from September 1, milk will cost Rs 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.