गणपतीत कोस्टल रोड २४ तास असेल खुला; नागरिकांनी सुविधेचा वापर करण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 10:45 AM2024-09-06T10:45:46+5:302024-09-06T10:49:30+5:30

गणेशोत्सवानिमित्त मुंबईसह राज्यभरातील भाविकांची मुंबईत लगबग वाढते. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांनी नागरिकांच्या सुविधेसाठी वाहतूकीत बदल केले आहेत.

in mumbai ganeshotsav 2024 coastal road will be open 24 hours at ganapati citizens are urged to use the facility  | गणपतीत कोस्टल रोड २४ तास असेल खुला; नागरिकांनी सुविधेचा वापर करण्याचे आवाहन 

गणपतीत कोस्टल रोड २४ तास असेल खुला; नागरिकांनी सुविधेचा वापर करण्याचे आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सवानिमित्तमुंबईसह राज्यभरातील भाविकांची मुंबईत लगबग वाढते. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांनी नागरिकांच्या सुविधेसाठी वाहतूकीत बदल केले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबरपर्यंत कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) वाहतुकीसाठी २४ तास सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीतजास्त कोस्टल रोडचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

हे मार्ग असणार बंद...

१) नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगांवकर मार्ग, जे. एस. एस. रोड, विठठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, राजा राम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टँक रोड, पंडिता रमाबाई मार्ग, दादासाहेब भडकमकर मार्ग हे वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येतील.

२) नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग (आवश्यकतेनुसार), महापालिका मार्ग (१७ सप्टेंबरला आश्यकतेनुसार), एस. व्ही. पी. रोड, संत सेना मार्ग, नानुभाई देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, जिनाभाई मुलजी राठोड मार्ग, पी. डिमेलो रोड अनंत चतुर्दशीला बंद ठेवण्यात येणार आहेत.

वाहन चालकांनी काय करावे?

१) पूर्वमुक्त मार्ग, अटलसेतुकडून दक्षिण मुंबईमार्गे उत्तर मुंबईकडे जाण्यासाठी पूर्वमुक्त मार्ग पी. डिमेलो मार्ग कल्पना जंक्शन, सीएसएमटी जंक्शन-महापालिका मार्ग - मेट्रो जंक्शन या मार्गिकेचा वापर करून कोस्टल रोडपर्यंत यावे.

२) उत्तर मुंबईकडून पूर्वमुक्तमार्गे दक्षिण मुंबईत अटल सेतुकडे जाण्यासाठी वाहन चालकांनी कोस्टल रोड दक्षिण वाहिनी, प्रिंसेस स्ट्रीट उजवे वळण, श्यामलदास जंक्शन - श्यामलदास मार्ग डावे वळण, मेट्रो जंक्शन महापालिका मार्ग उजवे वळण - सी. एस.एम.टी. जंक्शन - डावे वळण, भाटीया बाग जंक्शन डावे वळण कल्पना जंक्शन - पी. डिमेलो मार्ग - पूर्व मुक्त मार्ग, अटल सेतु या दक्षिण वाहिनीचा वापर करावा.

३) गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई यांसारख्या महत्त्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या ठिकाणी जोडणाऱ्या मार्गिका विसर्जनावेळी बंद ठेवण्यात येणार असून वाहने पार्क करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहे. याशिवाय २१ मार्गांवर मालवाहु वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे.

४) दादर येथील ज्ञानेश्वर मंदिर मार्ग, जांभेकर महाराज मार्ग, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, संपूर्ण केसकर रोड, एम. बी. राऊत रोड, टिळक ब्रिज, एस. के. बोले रोड हे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. जुहू येथीलही देवळे रोड, जूहुतारा रोड हे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

Web Title: in mumbai ganeshotsav 2024 coastal road will be open 24 hours at ganapati citizens are urged to use the facility 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.