Join us  

सोने ७१ हजार १०० रुपयांवर; दिवाळीत आणखी भाव वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:29 AM

सणासुदीबरोबरच लग्नसराईसाठीच्या खरेदीमुळे सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सणासुदीबरोबरच लग्नसराईसाठीच्या खरेदीमुळे सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत. आजघडीला सोन्याचा भाव प्रतितोला ७१ हजार १०० रुपये आहे. गणेशोत्सवातही सोन्याचा भाव ७१ हजार रुपयांच्या आसपास राहील, मात्र दिवाळीत सोन्याचा दर प्रतितोला ७५ हजारांवर जाईल, अशी शक्यता सराफा बाजाराने वर्तविली आहे.

लग्नसराईपासून विविध मुहूर्तावर सोन्याची खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच असून, सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. 

१) सोन्यामधील गुंतवणुकीचा परतावा चांगला मिळत असल्याने सोन्यातील गुंतवणूक घटण्याऐवजी वाढते.

२) बांगडा, द्वार याची खरेदी केली जात आहे. 

३) सोन्याचे मणी, सोन्याची नाणी खरेदी केले जात आहेत. 

४) पैजण, सोनसाखळीची विक्री होते आहे. 

५) जडशीळ दागिने, बुलियन आणि नाण्यांना कायम आहे.

६) सुनेसाती थांगड्‌या घेणे हैं शुभ मानले जाते. त्यामुळे बांगड्यांची खरेदी मोती होते. 

७) पुरुषांकडून सोनेसाखळी, पेंडंटची खरेदी केली जात आहे. 

८) पुरुषांचा अधिक भर व्होलो चेन, फैन्सी चेन खरेदी करण्यापर आहे.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याच्या भावात चत्र उतार होत असते. शिवाय आआंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा प्रभाव सोन्याच्या दरावर ५७ हजार होत असतो. आता सोन्याचा भाव प्रति तोका ७२ हजार १०० रुपये आहे. गणेशोत्सवातही हाच दर कायाम राहील. दिवाळीत मात्र सोन्याचा भाच प्रतितोळा ७५ हजार रूपये होण्याची शक्यता आहे. - निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते

कोणत्या कॅरेटमध्ये काय येते?

१८ कॅरेटमध्ये डायमंडचे दागिने बनतात. २२ कैरेटमधी सोन्याचे दागिने सनतात. २४ कॅरेटमध्ये गाणी, मार येतो. सोन्याचा भाव कॅरेटनुसार बदलतो.

सोन्याचे भाव (प्रति तोळा) -

२०२०- ५८,५०० रुपये 

२०२१- ५० हजार रुपये ५२ हजार रुपये

२०२२- ५० हजार रुपये

टॅग्स :मुंबईसोनंमहाराष्ट्र