हापूस आंब्याची फोड; मार्चमध्ये लागणार गोड! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 10:53 AM2024-03-12T10:53:39+5:302024-03-12T10:54:54+5:30

बाजारात हापूस आंबा दाखल झाला असून, सध्या तो खाणे सर्वसामान्यांना परवडणारे दिसत नाही.

in mumbai hapus mango has entered the market in march | हापूस आंब्याची फोड; मार्चमध्ये लागणार गोड! 

हापूस आंब्याची फोड; मार्चमध्ये लागणार गोड! 

मुंबई : बाजारात हापूस आंबा दाखल झाला असून, सध्या तो खाणे सर्वसामान्यांना परवडणारे दिसत नाही. मात्र, येत्या मार्च महिन्यात आंब्याची फोड सर्वांना लागणार गोड, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण, हवा तसा आंबा बाजारात आला नसल्याने त्याचे दर सध्या अधिक आहेत. मात्र, काही दिवसांत परवडेल अशा दरात फळांचा हा राजा प्रत्येकाच्या घरी उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.

...म्हणून तो कोकणचा राजा -

सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात. त्यामुळे आंब्याला ‘कोकणचा राजा’ असेही संबोधले जाते.

मार्चमध्ये आंबा स्वस्त!

१) जानेवारीमधील पाऊस वगळता हापूसच्या पिकासाठी वातावरण पोषक राहिल्याने फळधारणा चांगली झाली आहे. 

२)  पावसामुळे कर्नाटकसह कोकणातही फळबागांना फारसे नुकसान झालेले नाही. त्यामुळे पुढच्या म्हणजे मार्च महिन्यात हापूसचा आंबा स्वस्त दरात ग्राहकांना उपलब्ध होईल. 

३) सध्या घाऊक बाजारात ५०० ते १४०० रुपये डझन किमतीने आंबा विक्री होत आहे.

आंब्याच्या कोणत्या जातींना मागणी?

केशरी, राजापुरी, रायवळ, पायरी, दशेरी साखरी, खोबरी, तोतापुरी अशा जाती बाजारात उपलब्ध असून यांना जास्त मागणी असते.

दीड हजार रुपये डझन!

आमच्याकडे आंब्याच्या पेट्या आल्या आहेत, ज्या दीड हजार ते दोन हजार रुपयांच्या घरात आहेत. मात्र, उच्चभ्रू लोकांनाच ते घेणे परवडतो. असून, सर्वसामान्य लोक मात्र बॉक्सची फक्त किंमत विचारूनच निघून जातात. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा कोल्हापूर बाजार समितीत यंदा हापूस आंब्याची आवक चांगली असून,  कोकणाबरोबरच परराज्यातील आंबाही मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यामुळे दर नक्की कमी होतील.- मंगेश भांडे, आंबा, व्यावसायिक.

Web Title: in mumbai hapus mango has entered the market in march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.