Join us

सलाड मागोमाग, भाजीमधूनही टोमॅटो गायब? टोमॅटोचा भाव आणखी वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:35 AM

उन्हाळ्यात ५० रुपये जुडीपर्यंत गेलेले पालेभाज्यांचे दर पावसामुळे थोडेफार खाली उतरले आहेत.

मुंबई : उन्हाळ्यात ५० रुपये जुडीपर्यंत गेलेले पालेभाज्यांचे दर पावसामुळे थोडेफार खाली उतरले आहेत. मात्र, लसूण आणि शेवग्याचे दर चढेच असून टोमॅटोचे दरही अजून वाढण्याची शक्यता आहे. परिणामी आता सलाड मागोमाग भाजीमधूनही टोमॅटो गायब होतो की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.

सध्या टोमॅटोचा दर हा प्रतिकिलो ९० ते १०० रुपये आहे. मात्र येत्या काही दिवसात टोमॅटो प्रतिकिलो सव्वाशे रुपयांपर्यंत महाग होईल, अशी शक्यता भाजी विक्रेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे. भाज्या आयात केल्या जाणाऱ्या बऱ्याच राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. त्यामुळेच ठराविक भाज्यांचे दर हे वाढले असल्याचे व्यापारी सांगतात.

पालेभाज्यांचे दर-

१) पालक-३० ते ४०

२) मेथी -४० ते ५०

३) कांदा-२५ ते ३०

४) लाल माठ-३० ते ४०

५) शेपू-३० ते ५०

६) चवळी-८० ते १००

टॅग्स :मुंबईटोमॅटोभाज्या