कलिनात वृक्षांची बेकायदा कत्तल; पालिका अधिकाऱ्यांची तक्रार, वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:01 AM2024-06-21T10:01:24+5:302024-06-21T10:02:35+5:30

सांताक्रुझ पूर्वच्या कलिना परिसरात आठ झाडांची बेकायदा कापणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

in mumbai illegal cutting of trees in kalina complaint of municipal officers case has been registered in vakola police station  | कलिनात वृक्षांची बेकायदा कत्तल; पालिका अधिकाऱ्यांची तक्रार, वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा 

कलिनात वृक्षांची बेकायदा कत्तल; पालिका अधिकाऱ्यांची तक्रार, वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा 

मुंबई : सांताक्रुझ पूर्वच्या कलिना परिसरात आठ झाडांची बेकायदा कापणी करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पालिकेच्या एस पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाकोला पोलिसांत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार पल्लवी रणदिवे या एच पूर्व विभागात कनिष्ठ वृक्षाधिकारी म्हणून काम करतात. या विभागातील झाडांचे जतन, संरक्षण तसेच उद्यानाचे परिरक्षण हे त्यांचे कर्तव्य आहे. तसेच कोणीही अनधिकृत वृक्षतोड केल्यास त्याबाबत पाहणी करून अहवाल सादर करून पोलिस ठाणे तक्रार करण्याचीही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी वाकोला पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, कलिनात राहणाऱ्या व्ही. मिरांडा यांनी विभाग कार्यालयात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ ज्यूड मिरांडा याने काही माणसे आणून त्यांच्या मालमत्तेतील झाडांची कत्तल केली. 

मिरांडा यांच्या तक्रारीवरून १७ जानेवारी २०२४ रोजी रणदिवे यांनी कर्मचाऱ्यांसह वृक्षतोडीच्या जागेची पाहणी केली. तेव्हा त्याठिकाणी आठ झाडांची बेकायदा तोड केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मालाडच्या मालवणी परिसरात राहणाऱ्या ज्यूड मिरांडा याच्या विरोधात वाकोला पोलिसांत तक्रार दाखल केली.

तोडलेली झाडे -

१) नारळ- २

२) पेरू- २

३) अशोक- १

४) उंबर- १

५) जांभूळ- १

Web Title: in mumbai illegal cutting of trees in kalina complaint of municipal officers case has been registered in vakola police station 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.