Join us

वीज चोरी केली, तर ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास; बेकायदा जोडण्यांमुळे पुरवठ्यावर ताण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 10:27 AM

वीज चोरी करणाऱ्यांच्या अवैध वीज वापराचा भार, नियमितपणे वीजबिले भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांवर विनाकारण पडतो.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :वीजचोरी करणाऱ्यांच्या अवैध वीज वापराचा भार, नियमितपणे वीजबिले भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांवर विनाकारण पडतो. झोपडपट्टी विभागात जागा कमी असल्याने नव्या वीजजोडण्या देणे कठीण असते. तेथे आधीच विजेची मागणी जास्त असते. अवैध वीजजोडणी घेतल्यास तेथील वीज पुरवठ्यावर ताण येतो. त्यामुळे केबल, ट्रान्सफॉर्मर खराब होत असल्याने देखभाल खर्चही वाढतो, अशी माहिती वीज कंपन्यांनी दिली. यावर उपाय म्हणून वीज चोरीला आळा घालण्यासाठी कारवाई केली जात असून, गुन्हाही नोंदविला जात आहे.

अदखलपात्र गुन्हा-

वीजचोरी हा अदखलपात्र गुन्हा असून इलेक्ट्रिसिटी अॅक्ट २००३ च्या कलम १३५ नुसार दोषी व्यक्तीला आर्थिक दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात

मालाडला १ कोटी ३३ लाखांची चोरी-

मालाडच्या कुरार गावातील इलेक्ट्रोप्लेटिंग व्यावसायिक जैन ट्रेडरने अवैधपणे थ्री फेज डायरेक्ट सप्लाय वापरल्याचे जूनमध्ये आढळून आले. एक कोटी ३३ लाख रुपयांची त्याने वीज चोरी केल्याचे आढळले. त्याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

भार कमी होईल अदानी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाने वीज चोरीची तीन प्रकरणे उघडकीस आणली. यात साडेतीन कोटी रुपयांची वीज चोरी उघड झाली. आता हा तोटा कमी झाल्यामुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवरील अतिरिक्त भार कमी होईल.

मार्वेत एक कोटीची चोरी-

 वीज चोरी हा अदखलपात्र गुन्हा असून इलेक्ट्रिसिटी अॅक्ट २००३ च्या कलम १३५ नुसार दोषी व्यक्तीला आर्थिक दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मार्वे मानोरी रस्त्यावरील किनी फार्म हाउस अॅण्ड रिसॉर्टने अवैधपणे एक कोटी रुपयांहून जास्त रुपयांची वीज जोडणी घेतल्याचे डिसेंबरमध्ये आढळून आले. याप्रकरणी कांदिवली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला

वायर जप्त-

चालू आर्थिक वर्षात वीज चोरीसाठी वापरलेली ६० टन वजनाची उपकरणे आणि वायर जप्त करण्यात आल्या. 

वीज चोरीचा अंधेरीतही गुन्हा-

अंधेरीत क्रोहास्ट प्लास्टिक मोल्डिंग मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडने अवैध वीज जोडणी घेतल्याचे जुलैत आढळून आले. त्याने एक कोटी रुपयापेक्षा जास्त वीज चोरी केली होती. याप्रकरणी खेरवाडी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईवीजचोरीगुन्हेगारीपोलिस