मुंबई :पश्चिम रेल्वेने आठ विशेष ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
वांद्रे टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक स्पेशल गाडी ३१ ऑगस्टपर्यंत, तर गोरखपूर-वांद्रे टर्मिनस साप्ताहिक गाडी ३० ऑगस्टपर्यंत चालवण्यात येणार आहे. वांद्रे टर्मिनस-भावनगर टर्मिनस साप्ताहिक स्पेशल गाडी ३० ऑगस्टपर्यंत, तर भावनगर टर्मिनस-वांद्रे टर्मिनस साप्ताहिक गाडी २९ ऑगस्टपर्यंत सोडण्यात येणार आहे. सूरत-ब्रह्मपूर साप्ताहिक स्पेशल गाडी २७ नोव्हेंबर, तर ब्रह्मपूर-सूरत साप्ताहिक गाडी २९ नोव्हेंबरपर्यंत चालवली जाणार आहे.
वलसाड-भिवानी साप्ताहिक स्पेशल गाडी २९ ऑगस्ट, तर भिवानी-वलसाड साप्ताहिक स्पेशल गाडी ३० ऑगस्टपर्यंत चालवली जाईल. वडोदरा-सियालदह साप्ताहिक गाडी २६ सप्टेंबरपर्यंत, तर सियालदह-वडोदरा साप्ताहिक स्पेशल गाडी २४ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहे.
१ डिसेंबरपर्यंत सेवा-
१) अहमदाबाद-पटना साप्ताहिक गाडी २५ ऑगस्टपर्यंत, पटना-अहमदाबाद गाडी २७ ऑगस्टपर्यंत तसेच साबरमती-हरिद्वार द्वि-साप्ताहिक गाडी २९ नोव्हेंबरपर्यंत, तर हरिद्वार- साबरमती गाडी ३० नोव्हेंबरपर्यंत चालवली जाईल.
२) डॉ. आंबेडकर नगर-श्री माता वैष्णोदेवी कटरा त्रि-साप्ताहिक गाडी ३० नोव्हेंबरपर्यंत, तर श्री माता वैष्णोदेवी कटरा-डॉ. आंबेडकर नगर गाडी १ डिसेंबरपर्यंत चालवली जाईल.